७८ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनमध्ये नाशिक येथे झालेल्या विक्रमगड तालुक्यातील विद्यार्थ्याचा द्वितीय क्रमांक
जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर
विक्रमगड तालुक्यामधील विद्यार्थी हे विविध ठिकाणी जावून आणि आपले अनेक स्पर्धे मध्ये सहभागी होत असतात आणि आपल्या शाळेचे व विद्यालयाचे नाव रोशन करत असतात.
अश्याच प्रकारे नुकतीच नाशिक येथे झालेल्या नाशिक कला निकेतन, नाशिक आयोजित ७८ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शन २०२२-२०२३ रोजी उद्घाटन समारंभ ११/०२/२०२३ रोजी पार पडल्या या कला प्रदर्शन स्पर्धेत कुमार संदेश जोसेफ तुंबडा मुक्काम माडाचापाडा कऱ्हे तालुका विक्रमगड येथील रहवासी असून यांनी आपल्या मेहनतीने दी गोल्डन ब्युटी हे चित्र कलाकृत करून ७८ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात पाठवली होती आणि या कला प्रदर्शन मधून या विद्यार्थ्यानी दुसरा क्रमांक आणून आपल्या गावाचे व तालुक्याचे नाव उंचावले आहे आणि हे प्रदर्शन शंकराचार्य डॉ. कुर्त कोटी सभागृह नाशिक येथे पुढील १५/०२/२०२३ पर्यंत चालू राहील अशी माहिती देण्यात आली आहे.
हा विद्यार्थी सदर जमशेद आणि शिरीन गझदर दृकाकला महाविद्यालयात फाईन आर्ट चौथ्या वर्षात असून त्याला येथील प्राचार्य मा. श्री. विनय पाटील सर व प्राध्यापक सिद्धार्थ माच्छी सर व प्रियदर्शनी मर्दे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि तसेच गावातून व तालुक्यातून त्याचा गौरव करण्यात येत आहे.