मारवड महाविद्यालयाच्या तुळजेश पाटील याची विद्यापीठाच्या क्रिकेट संघात निवड
अमळनेर प्रतिनिधि/ विशाल मैराळे
मारवड, मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड. संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील F Y B A च्या वर्गातील विद्यार्थी तुळजेश दिलीप पाटील याची नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रिकेट संघात निवड झाली. या संघाने नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा, शिखर (राजस्थान) येथे सहभाग घेतला. या आंतर विद्यापीठ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला.
क. ब. चौ. उ. म. विद्यापीठाच्या क्रिडा क्षेत्रात हा संघ पहिल्यांदाच अखिल भारतीय स्पर्धेस पात्र ठरला आहे. यात तुळजेश दिलीप पाटील या विद्यार्थ्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. आबासो जयवंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर संस्थेचे उपाध्यक्ष मा. आबासो. देविदास शामराव पाटील संस्थेचे सचिव मा. आबाजी देविदास बारकू पाटील तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रिडा संचालक व महाविद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.