धक्कादायक ; अर्धापूरात सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार...!
कामठा बु. येथील घटना,आरोपीस काही तासातच अटक, आपोक्सोअँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील कामठा बु. येथील एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटना अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडली. एका तरुणाने सहा वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच स.पो.अधीक्षक गोहर हसन, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी आरोपीस काही तासातच ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१३ फेब्रुवारी रोजी दुपारी अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथील एका सहा वर्षाच्या बालीकेस चॉकलेटचे आमिष दाखवून गुन्ह्यातील आरोपी राहुल संजय इंगोले याने चिमुकलीस गावातील बस स्टॅन्ड कडे जाणाऱ्या रोडवरील पुलाखालील पाईप मध्ये नेऊन मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. सदर घटने प्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात दि.१३ रोजी रात्री ९:३० ते १० दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आपोक्सोअँक्ट प्रमाणे गुन्हाला आहे. या प्रकरणी कलम ३७६ (१),(२)(आय)(जे),३२३ भा.दविसह कलम ४,६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे, पोउनि कैलास पवार,पोउनि शिवाजी वड,जमादार राजेश घुन्नर, गुरुदास आरेवार यांनी सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसर पिंजून काढला व गुन्ह्यातील आरोपी राहुल संजय इंगोले वय २० वर्षे व्यवसाय मजुरी रा. कामठा बु. ता.अर्धापुर जि.नांदेड यास अटक केली असून या गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड हे करीत आहेत.