तलासरी येथे झालेल्या ३५ किलो वजनी गट कबड्डी क्रीडा स्पर्धेत मुलींचा दणदणीत विजय
जव्हार - दिनेश आंबेकर
तलासरी तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. अनेक खेळ घेतले जातात आणि या खेळामध्ये विविध ठिकाणाहून तसेच तालुक्यातून खेळाडू येऊन आणि आपल्या शाळेचे व तालुक्याचे नाव रोशन करत असतात.
असेच विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोल्हारी बुद्रुक यांनी माजी विद्यार्थी सेवा भावी संस्था तलासरी यांच्या कै. माधवराव काणे व कै. चिंतामण जी वनगा साहेब स्मृती कबड्डी चषक २०२३ आयोजित ३५ किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील मुलींचा प्रथम क्रमांकाने दणदणीत विजय झाला.
त्या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शक कोच श्री. संतोष गणपत उमतोल सर, माजी उपसरपंच श्री. एकनाथजी हरपाले साहेब, उपस्थित होते. या मुलींच्या विजया बद्दल माकप चे राज्य तथा ठाणे - पालघर जिल्ह्याचे सचिव कॉ. किरण गहला साहेब तसेच डोल्हारी बुद्रुक गावाचे सरपंच आदरणीय श्री. विलास जी गहला साहेब, उपसरपंच,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री. सुरेश कनोजे सर व शिक्षक वृंद, शा. व्या. समिती व अध्यक्ष, ग्रामस्थ व पूर्ण विक्रमगड तालुक्यातून या विजेत्या मुलींचे गोड कौतुक केले जात आहे.