छत्रपती शिवाजी महाराज चौक फलकाचे अनावरण
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
दहिवड, ता देवळा , जि - नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक फलकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले.गावातील ज्येष्ठ नागरिक श्री .बाबू बशीर तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कवी व लेखक माजी केंद्रप्रमुख श्री. वां. ग.सोनवणे सर हे होते. सदर कार्यक्रम प्रसंगी सरपंच सौ.पुष्पा संदीप पवार ,उप सरपंच राजाराम ठाकरे,नारायण देवरे,पुंजाराम देवरे,विलास देवरे,अमोल अहिरे, शरद (बाब्या)देवरे,सर्व ग्रा. प.सदस्य तसेच दहिवड गावातील बाहेर गावातील सर्व धर्म समभाव नागरिक हजर होते .
सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री.संजय दहिवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.