Type Here to Get Search Results !

पंढरपूरमध्ये प्रथमत: अखिल भारतीय भव्य शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन



पंढरपूरमध्ये प्रथमत: अखिल भारतीय भव्य शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन


तहसीलदार सुशील बेल्हेकर यांचे हस्ते स्पर्धेचे संघ व संघाचे प्रायोजक निवड सोडत जाहीर 


पंढरपूर (प्रतिनीधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मा. प्रशांतराव परिचारक यांच्या संकल्पनेतून आणि पंढरपूर येथील व्हॉलीबॉल संघाच्या सहकार्याने दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२३ रोजी पंढरपुर शहारामध्ये पहिल्यांदाच अखिल भारतीय भव्य राष्ट्रीय शूटिंग हॉलीबॉल (निमंत्रित) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  




या स्पर्धेसाठी देशभरातून राज्याच्या नावाने १२ संघ तयार करण्यात आले आहेत. या बारा संघाच्या प्रायोजकांची निवड मंगळवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास दूध पंढरी येथे मा. तहसिलदार सुशील बेल्हेकर यांचे शुभहस्ते मंडल अधिकारी माने, दूध पंढरी प्रकल्प प्रमुख श्री. जगदाळे, पत्रकार बांधव व सर्व पंढरपूर व्हॉलीबॉल संघ सदस्यांच्या उपस्थितीत सोडत काढून जाहीर करण्यात आली.


या सोडती दरम्यान मा. तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी हॉलीबॉल खेळाविषयी सांगितले की, मन, मेंदू व मनगट या सर्वांचा त्रिवेणी संगम म्हणजे व्हॉलीबॉल. यामुळे शारीरिक तंदुरुस्ती, खिलाडू वृत्ती, चपळता व संघ भावांना विकसित होते. या खेळाचा शालेय क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत सहभाग आहे. तसेच या हॉलीबॉलचा लवकरच ऑलिम्पिक स्पर्धेतही समावेश होईल अशी आशाही तहसीलदार यांनी व्यक्त केली.


या दिवशी असेल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 



सदर स्पर्धा स्टेशन रोडवरील टिळक स्मारक मैदानावर होणार असून या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि‌. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४ वाजता मा. शिरीष सरदेशपांडे (पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. सदर स्पर्धा या दोन दिवस चालणार आहेत. त्यामुळे पंढरपूर मधील क्रीडा प्रेमींना या खेळाचा भरपूर आनंद घेता येणार आहे. 


दरम्यान राष्ट्रीय शूटिंग बॉलचे जनरल सेक्रेटरी मा. श्री रविंद्र तोमर यांनी या खेळाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आपण झटत आहात. याबद्दल संयोजन समितीचे कौतुक करून समाधान व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.


या स्पर्धेत देशभरातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू व दिग्गज राष्ट्रीय खेळाडू सहभागी होत आहेत. आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात प्रथमत:च होत असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धा मा. जयंत खंडागळे (आंतरराष्ट्रीय खेळाडू) उपकर्णधार भारतीय शूटिंग बॉल यांच्या अथक प्रयत्नाने आपणास पहावयास मिळणार आहेत. याबद्दल माननीय तहसीलदार बेल्हेकर साहेबांनी त्यांचे अभिनंदन केले.


सामाजिक संघटना व क्रीडाप्रेमींकडून अपेक्षा ....


या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पंढरपूर हॉलीबॉल संघातील सर्वच खेळाडू व क्रीडाप्रेमी अविरत परिश्रम घेत आहेत परंतू तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी व क्रीडाप्रेमींनीही एकत्र येऊन सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष शशी भोसले, संयोजन समिती प्रमुख नागनाथ क्षीरसागर व सोमनाथ कराळे यांनी केले. तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख जयंत खंडागळे व देशमुख सर समाजातील विविध सामाजिक संघटना व क्रीडाप्रेमींही सर्वतोपरी सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. 


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अविनाश कदम सर यांनी व आभारप्रदर्शन श्री. दीपक इरकल सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad