सिलिंगपूर येथे लुपिन फाउंडेशनच्या बीसीआय तर्फे शालेय आरोग्य तपासणी शिबीर
तळोदा तालुक्यातील सिलिंगपुर या गावात लुपिन फाऊंडेशन अंतर्गत चालत असलेले BCI प्रकल्प, प्रकल्प व्यवस्थापक सुनिल सैंदाने, व जील्हा प्रकल्प समन्वयक दिपक जाधव यांच्या मार्गर्शनाखाली फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. देशबंधूजी गुप्ता यांची जयंती निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक संदिप तोरवने यांनी कार्यक्रमात आलेले मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली व सदर दिवशी ( सेवा दिवस) साजरा करण्याचे प्रस्ताविक पियु व्यवस्यापक अभंग जाधव यांनी उपस्थित मान्यवरांना, गावकरीना, व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व तसेच जि.प. शाळेचे शिक्षक उमाकांत पाटिल यांनी देखील चांगल्या प्रकारे डॉ.देशबंधूजी गुप्ता यांच्या बाबत माहिती दिली. तसेच( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिलींगपुर), व (एस.ए.मिशन प्रथमिक शाळा सिलींगपुर ) शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर (हेल्थ कॅम्प) करण्यात आले. त्यात 147 शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी डॉ. संजय चव्हाण यांनी शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी केली. तसेच सरपंच रायसिंग मोरे, उपसरपंच प्रवीण मोरे माजी सरपंच रमेश ठाकरे व अंगणवाडी सेविका संगीता पवार , (एस.ए.मिशन प्राथमिक शाळा जुने सिलिंगपुर),संजय पाटील (मुख्यध्यापक), पांडुरंग मराठे,सोनालीपाखडे गोरख पाटील सर.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (नवे सिलिंगपुर)
सतीश शिंदे (मुख्यध्यापक),उमाकांत पाटील,नितीन वसावे सरशिक्षक, शिक्षिका, यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले. तसेच शेतकरी, व गावकरी उपस्थित होते. BCI प्रकल्पाचे सर्व कृषी मित्र:- मनोज वसावे, आसिम तेली, प्रताप वसावे, सुनिल सिरसाठ, अजय चव्हाण,हरिष खर्डे, उमेश शिवदे, दिनेश कोते, जितेन्द्र वळवी, प्रदिप पटले, विनोद डोंगरे, चेतन बोरसे, ज्योती पाडवी, लक्ष्मी पाडवी, सुलक्षणा ठाकरे आदींसह उपास्थित होते.