वाढदिवसाचे औचित्य साधून वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शक्तीस्थळ येथे उपस्थित राहून त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्रपणे अभिवादन केले. त्यानंतर टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे उपस्थित राहून वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी तसेच ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप यांनी भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर आनंद आश्रम येथे जमलेल्या लहान मुलांना क्रीडा साहित्य आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर न्यायज्योत या नवीन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे गरीब आणि गरजू नागरिकांना विनामूल्य वकिली सल्ले देण्यात येणार आहेत. तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शहरप्रमुख हेमंत पवार, ठाणे जिल्हा महिला सेना संघटक सौ.मीनाक्षी शिंदे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, विभागप्रमुख पवन कदम, प्रवक्ते राहुल लोंढे, टेंभीनाका शिवसेनेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.