महाआरोग्य शिबिर व जागरुक पालक तर सुदृढ बालक मोहीम उदघाटन
प्रा. आ. केंद्र सोमावल व प्रा. आ. केंद्र बोरद येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या "जागरुक पालक तर सुदृढ बालक मोहीम व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत प्रमुख पाहुणे पं.स. सभापती श्रीमती लताताई अर्जुन वळवी, जि.प.सदस्य सुनिताताई पवांर, पं.स. सदस्य सुमनताई वळवी, चंदन ठाकरे तुळाजा सरपंच' मीराताई राहसे, बोरद सरपंच अनिताताई भिलाव व सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक पुरुष, महिला उपस्थित होते. सूरुवातीस प्रा. आ. केंद्र सोमावल येथे महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आ. राजेश पाडवी यांनी केले व
उपस्थित कार्यक्षेत्रातील गरोदर माता व स्तनदा माता व गरजू रुग्ण यांना आरोग्य विषयक योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा. व महाआरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर आले असून सर्व तपासण्या करून घेण्याबाबत आव्हान केले. व गंभीर व दुर्धर आजाराचे रुग्ण यांना गरजेनुसार जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे संदर्भित करावे व सर्व गरजू रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार असल्याने वेळेत निदान होऊन उपचारासाठी सर्व उपाययोजना शासना मार्फत करण्यात येतील त्याचा लाभ गरजू रुग्णांना घ्यावा असे सांगितले.
तसेच गरोदर मातानी आहार वेळेवर घ्यावा व दरमाह गर्भाची तपासणी करून घ्यावी व सरकारी दवाखान्यात प्रसूती करावी असे आवाहन केले. तसेच लहान मुलांचे लसीकरण न चुकता वेळे वर करून घेण्या बाबत सांगितले.
तसेच बोरद येथील जिल्हा परिषद शाळेत जागरूक पालक तर सुदृढ बालक मोहिमेचे राज्यस्तरीय
झूम मिटींग द्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांनी 'जागरुक पालक तर सुदृढ बालक मोहीम बाबत मागदर्शन केले त्या प्रसंगी बैठकीत आमदार राजेश पाडवी,श्रीमती सुनीता ताई(जि.प.सदस्य),श्रीमती.अनिता भिलाव सरपंच,मीराताई सरपंच तुळाजा व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, व वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण लांडगे,शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित राहुन पूर्ण वेळ सर्व मान्यवर उपस्थित होते.
प्रा.आ. केंद्र बोरद येथील महामेळाव्यात डॉ.महेंद्र चव्हाण यांनी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व 'जागरुक पालक तर सुदृढ बालक' मोहीमेविषयी विस्तृत माहिती दिली. 0-१८ वयोगटातील शाळेतील व शाळाबाह्य मुलां-मुलींची आरोग्य तपासणी औषधोपचार व पुढील सर्व गरजेच्या आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितले.
आ. राजेश पाडवी यांनी उपस्थित सर्व लाभार्थी यांना विविध आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी आव्हाहन केले तसेच लहान मुलांमध्ये होणाऱ्या जन्मतः आजार ह्दयरोग व इतर व्यंगत्व यासाठी तपासणी करून लवकरात लवकर उपचार व गरज पडल्यास शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागातील वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत पाठपुरावा करण्याबाबत सांगितले. तळोदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आज महाआरोग्य शिबिरात गरोदर माता, स्तनदा माता व ते 0 ते ६ वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात आले यांत २७८ गरोदर माता 0-६ बालके - २३१'च इतर करिक साधारण रुग्ण १७० असे एकूण ६७९ रुग्णांची तपासणी वं
उपचार करण्यात आले. त्यापैकी अतिजोखमीच्या माता,लहान मूले व इतर गंभीर आजाराचे एकुण ४८ रुग्ण यांना संदर्भसेवा देण्यात आली.
तालुकास्तरीय पर्यवेक्षक श्री. दिलीप पाटील, एस. बी. वाघ, देवेंद्र राठोड, हितेश गांगुर्डे व नंदू गिरा से इ. उपस्थित होते.
प्रा.आ.केंद्र सोमावल व बोरद येथील सुधिर ठाकरे, डॉ. प्रशांत पवार, डॉ. अरुण लांडगे डॉ. स्वाती पावरा डॉ. सचिन पाटील डॉ. राकेश पावरा डॉ. विशाल चौधरी,डॉ.तुषार पटेल,डॉ.माधुरी पाटील, डॉ. इम्रान शेख. व आरोग्य सहायक व सहायिका, आरोग्य सेवक,आशा कर्मचारी व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, गटप्रवर्तक यांनी कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्रयत्न केले.
सूत्र संचालन मुकेश कापुरे व आभार डॉ.अरुण लांडगे यांनी मानले.