Type Here to Get Search Results !

अवैध रेती तस्करांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता


अवैध रेती तस्करांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता



यवतमाळ प्रतिनिधी :-संजय जाधव


 जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दि 13 जानेवारी रोजी तालुका दंडाधिकारी यांना तालुक्यात लिलाव न झालेल्या रेती घाटावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करून प्रत्येक गावात दवंडी देण्याचे आदेश दिले असतांनाही तहसीलदार व तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी सर्वसामान्याकडून चर्चा होत आहे. सन 2022-23 या वर्षी जिल्ह्यातील लिलाव न झालेल्या रेती घाटातून विनापरवानगी मजुर जेसीबी पोकलेन मशीन चा वापर करून




रेतीचे अवैध उत्खननावर प्रतिबंध व पर्यावरणाची हानी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने तथा सार्वजनिक शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात लिलाव न झालेल्या वाळू घाटामध्ये 24 तास या कालावधीसाठी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिले व महसूल विभागातील याबाबत कोतवाला मार्फत दवंडी देऊन प्रसिद्धी करावी तसेच अहवाल कार्यालयास सादर करावा असे पत्र जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला दिले असतानाही अद्यापही सदर जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाची दखल घेतल्या गेलेली नाही आहे




रात्री बाराच्या नंतर बोरगाव डोगरगाव भवानी येथील काही तरुण येथील रेती तस्कर रात्रीच्या अंधारात खुलेआम टँक्टर व छोटा हत्तीने रेती तस्करी करतात व नदीपात्रावर एकमेकांसोबत व शेतकरी सोबत वाद घालत असतात सदर प्रकरणी महसूल अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही. रेती घाटावर वारंवार होणारी भांडणे आणि हाणामारी पाहू जाता भविष्यात रेतीघाटावर मोठी घटना सुद्धा घडू शकते याची शक्यता नाकारता येत नाही.




जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे सामान्याकडून सांगण्यात येत आहे. पैनगंगेच्या व नाल्याच्या पात्रातून खुलेआम रेतीची तस्करी सुरू असतानाही महसूल प्रशासन अद्यापही लक्ष देत

नसल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार यांना तपासणी व चौकशी नाका लावण्याची आदेश दिले असतानाही कुठल्याच ठिकाणी तपासणी व चौकशी नाका लावण्यात आलेले नाही त्यामुळे वाळू तस्करांचे महसूल प्रशासन हात बळकट करीत दाट संशय येत . आहेत का असेही बोलल्या जात


रेती वाहतूकीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे लक्षण बोरगाव डोंगरगाव येथून रात्री बाराच्या नंतर खुलेआम ट्रॅक्टर द्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे त्यातच वाळू तस्करांमध्ये दररोज वादावादी होत आहे. सदरील वादावादीचे रूपांतर अनेक वेळा भांडणामध्ये झालेले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही ? अवैध रेती वाहतुकीवर जर आळा बसत नसेल कधीच मिटणार नाही याची पण महसूल प्रशासनाने काळजी घेण्याचे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

बोरगाव डोंगरगाव

 येथील पैनगंगा नदी पात्रावरून खुले ट्रॅक्टर द्वारे रेतीची वाहतूक केली जात आहे अद्यापही महसूल प्रशासन यावर कारवाई करत पत्राची दखल न घेतल्याची संबंधित तलाठयानी गावामध्ये आतापर्यंत एकही कारवाई न केल्याची बोलल्या जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad