चोपडा शहरात तरुणाचा भीषण आगीत मृत्यु
जळगाव जिल्हा/प्रतिनिधि: विशाल मैराळे
शहरात मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे चोपडा शहरात काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास राहुल एम्पोरियम या दुकानाला आग लागली या आगीचे लोळ याच इमारतीत राहणाऱ्या राखेच्या कुटुंबियांच्या घरापर्यंत पोहचले या अग्नितांडवात गौरव सुरेश राखेच्या या ३० वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू झाला तर संकेत राखेच्या हे जखमी झाले आहेत दरम्यान या कुटुंबातील सुरेश राखेच्या आणि कविता राखेच्या यांना घरातून सुरक्षित पने बाहेर काढण्यात यश आले आहे आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी विझवण्यासाठी प्रयत्न केले तसेच नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने धाव घेतल्याने बऱ्याच वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे तर गौरव राखेच्या यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर वाज्रघात झाला आहे