Type Here to Get Search Results !

जव्हार ढाढरी जांमुळमाथा ग्रामपंचायत सदस्याला पाच अपत्य सदस्य पद रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी



जव्हार ढाढरी जांमुळमाथा ग्रामपंचायत सदस्याला पाच अपत्य सदस्य पद रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी


जव्हार प्रतिनिधी : सुनिल जाबर


जव्हार तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच काही महिन्या अगोदर पार पडल्या आहेत .परंतु निवडणुकीत काही उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र भरताना राज्य निवडणूक आयोगाची फसवणूक झाल्याचा सावळा गोंधळ पहावयास मिळत आहे .अशाच धक्कादायक प्रकार जव्हार तालुक्यात ढाढरी जांमुळमाथा ग्रामपंचायत मध्ये घडला आहे.ग्रामपंचायत निवडणूकिसाठी निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना राज्य निवडणूक आयोगाने नियमांचे महाराष्ट्र राज्याचा ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार काटेकोरपणे पालन करून त्यामध्ये कौटुंबिक सखोल माहिती किंवा उमेदवारांना अपत्य संख्या ती भरावी लागते.

  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९९५ नुसार १३ सप्टेंबर २००० रोजी उमेदवाराची अपत्य संख्या २ पेक्षा अधिक असली तरी अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरत नाही.मात्र १२ सप्टेंबर २००१ नंतर उमेदवाराला झालेल्या अपत्यांचा एकूण भर पडत असल्यास अशा व्यक्ती निवडणुका लढविण्यास अपात्र ठरतात ." अशा ग्रामपंचायत निवडणूक अपत्य नियम आहे ".या नियमांचे उल्लघन करून जव्हार ढाढरी ग्रामपंचायतीच्या एक सदस्याने निवडणूक लढवून आदिवासी समाजाची फसवणूक केली आहे.

  जव्हार तालुक्यातील ढाढरी जांमुळमाथा ग्रामपंचायतीत तीन प्रभागात निवडणूक झाली होती त्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने बाजी मारली होती.त्यात ७ सदस्य निवडून आलेले आहेत त्यातील जांमुळमाथा येथील सदस्य कासम भिवा अकणे याने ५ अपत्य असतानाही सदर माहिती निवडणूक अर्ज भरताना लपवून ठेवली या व्यक्तीला २००१ नंतर ३ अपत्य अशून ती गगनगिरी आश्रमशाळा हिरडपाडा येथे शिक्षण घेत आहेत त्या अपत्यामध्ये कु.बेबी कासम अकणे जन्म दिनांक ११ नोव्हेंबर २००८ कु.दिपाली कासम अकणे जन्म दिनांक ३० मार्च २०१० या दोन्ही इयत्ता ७ वित शिक्षण घेत आहेत तर कू मोहिनी कासम अकणे जन्म दिनांक १६ मे २०११ ही इयत्ता ५ वित शिक्षण घेत आहे त्यामुळे सण २००१ नंतर अपत्य झालेल्या उमेवारांना निवडणुका लढविण्यास अपात्र असताना ही निवडणूक कशी लढवली ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

 ढाढरी ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले सदस्य कासम भिवा अकणे यांच्या अपत्यांची चौकशी करून निवडणूक आयोगाची व शासनाची फसवणूक केल्याबाबत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे सदस्य पद रद्द करण्याची मागणी ढाढरी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

""संबधित सदस्य निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास अपात्र असताना ग्रामस्थांनी विचारणा केली असता मी निवडणूक उमेदवारी अर्ज भरत नसून दुसऱ्याचा अर्ज भरत आहे असे सांगून आदिवासी समाजाची घोर फसवणूक केली आहे "जितेश देवराम अकणे ( जांमुळमाथा ग्रामस्थ )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News