Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दशरथ करांडे यांना प्रदान



महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दशरथ करांडे यांना प्रदान 


       क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा रंग शारदा सभागृह, के.सी. मार्ग, बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा (पश्मिच), मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.




सदर पुरस्कार वितरण सोहळ्यास पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोंढा शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव रणजित सिंह देओल इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.




    महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सवित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार दशरथ रामभाऊ करांडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा शेलवाई तालुका तळोदा.जिल्हा नंदुरबार यांना सण २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    

        शिक्षक हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे.समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो.आश्या समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते.


        सण २०२२-२३ चे वर्षे हे शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्षे म्हणून साजरे करण्यात येत आहे .त्यामुळे गुणवत्तावाढीसाठी लागणाऱ्या दुरष्टिकोनाणे काम करणाऱ्या शिक्षकांची निवड करण्यात येणार होती.


         करांडे दशरथ रामभाऊ जिल्हा परिषद शाळा शेळवाई केंद्र मोदलपाडा ता तळोदा जिल्हा नंदुरबार यांचे पुस्तक आपल्या भेटीला नवोपक्रम,

 शालेय मंत्रिमंडळ नवोपक्रम,लोकसभा विधानसभा प्रभाव शाली पूर्व तयारी केल्याबद्दल शहादा मतदार संघातून शेलवाईचा मतदान टक्केवारीत दुसरा क्रमांक जिल्हा स्तर उत्कृष्ट बूथ लेवल ऑफिसर पुरस्कार प्राप्त. शालेय बालन्यायायलय नवोपक्रम,माझं घर व अंगण हीच शाळा नवोपक्रम (कोविड १९ काळात), मंगळवार आमचा विज्ञानातील प्रयोगाचा (कोविड १९ काळात).शनिवार पुस्तक आपल्या भेटीला,अभ्यास तपासणी दिवस, ग्रहभेटी,मराठी,गणित व इंग्लिश अभ्यास डायरी पुस्तके लेखन असे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विविध नवोपक्रमाचे आयोजन केले.  

  राज्यस्तरीय स्पर्धेत लेखन व सादरीकरण केले.


        नवीन शिकण्यासाठी 

विवीध ऑनलाईन प्रशिक्षण व कोर्स पूर्ण केले,प्रत्येक वर्षी शैक्षणिक संशोधने केली , वर्तपत्रात अनेक लेख प्रकाशित झाले आहेत, शिक्षकाने केलेल्या सामाजिक,शैक्षणिक, राष्ट्रीय कार्य इ.साठी शासनाकडून जिल्हा स्तर पाच, राज्यस्तर एक पुरस्कार व खाजगी संस्था कडून अनेक पुरस्कार गुरुजींना प्राप्त झाले आहेत. शाळेला शासनाचे पुरस्कार भेटले आहेत,शाळेच्या भौतिक व शैक्षणिक उन्नती साठी समाजाकडून वस्तुस्वरूपात सहभाग घेतला, अनेक प्रशिक्षणात तज्ञ मार्गर्शक म्हणून काम पाहिले,शैक्षणिक क्षेत्राला गुणवत्तेला स्वतःच्या नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारे कार्य केले,

        

      राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य,पुणे आयोजित विवीध ऑनलाइन उपक्रमात तालुका,जिल्हा,राज्यस्तर स्पर्धातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग नोंदविला. माननीय भारतीय निवडणूक आयोगाचे मतदान कार्डला आधार कार्डशी लिंक करणे या राष्ट्रीय कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्य़ातील प्रथम पहिले १०० टक्के पुर्ण गाव शेलवाई केले.गावतातील प्रत्येक मतदार साठी स्मार्ट मतदान कार्ड रिकाम्या वेळी बूथ लेवल ऑफिसर म्हणून बनवून वाटप केले. 


    राज्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार निवडण्यासाठी यंदा दोन वर्षानंतर निवडकरण्यात येते आहे. शासनाने शिक्षकाकडून नामांकन मागवले.आधी शाळा स्तर,जिल्हास्तरावर व नंतर राज्यस्तरावर मुलाखती घेऊन केलेल्या कामाची पडताळणी करून गुणदान केले. पाच वर्षाच्या कामाचे गुणांकन प्राप्त शिक्षकांची माहिती शासनाला कळविण्यात आली. त्यातून 108 शिक्षकाची निवड राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार साठी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad