Type Here to Get Search Results !

रामदेव बाबांच्या योग क्रांतीची चळवळ सातपुड्यात पोहोचवा राज्य प्रभारी दिनेश राठोड यांचे आवाहन



रामदेव बाबांच्या योग क्रांतीची चळवळ सातपुड्यात पोहोचवा राज्य प्रभारी दिनेश राठोड यांचे आवाहन


नंदुरबार:-

 ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे रामदेव बाबा यांचे कार्य सुरू आहे. नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात योग क्रांतीची चळवळ मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यासाठी सर्वसाधक आणि योग शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन भारत स्वाभिमानचे महाराष्ट्र पूर्व राज्य प्रभारी दिनेश राठोड यांनी व्यक्त केले.




पतंजली योग समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरीय पदाधिकारी नंदुरबारात आले होते.

येथील डीएसके सभागृहात आयोजित बैठकीत मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य प्रभारी दिनेश राठोड पुढे म्हणाले की,भारतीय संस्कृतीत संत ऋषीमुनींच्या पावन भूमीत  हजारो वर्षापासून योग सुरू आहे.हल्ली मोबाईल, सोशल मीडिया आणि दूरचित्र वाहिनीमुळेआरोग्यावर दुर्लक्ष होत आहे.भारतीय आहार, विचार,विहार,दुरापस्त होत चालले असून प्रत्येकाने योग केल्यास आरोग्य सुधारेल असा आत्मविश्वास राठोड यांनी व्यक्त केला.




किसान सेवा समितीचे राज्य प्रभारी दत्तात्रय काळे,भारत  स्वाभिमानचे सहराज्य प्रभारी अनिल अमृतवार,नाशिक विभाग मंडळ प्रभारी मिलिंद गणकर यांनी देखील मार्गदर्शन केले.




नंदुरबार जिल्हा पतंजली समितीतर्फे 25 दिवसीय योग प्रशिक्षण शिबिरात अनेक शिक्षक शिक्षिकांना  प्रशिक्षित करण्यात आले. याशिवाय हरिद्वार येथील मुख्य शिबिरात सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हा प्रभारी एन.डी. माळी यांनी प्रास्ताविकात सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संघटन प्रमुख वसंत पाटील यांनी तर आभार कैलास भावसार यांनी मानले.या बैठकीस नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा, धडगाव, येथील साधक उपस्थित होते.यशस्वीतेसाठी भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी नवनीत शिंदे, तालुका प्रभारीअजयसिंह गिरासे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महादू हिरणवाळे, विनोद सैंदाणे, प्रमोद मराठे, किशोर भावसार, भास्कर रामोळे,आर.ओ. मगरे, अशोक सूर्यवंशी,श्रीकांत पाठक , रामकृष्ण मोरे, भरत पटेल, किरण राजपूत,कांचन मुलानी आदींसह पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, महिला योग समिती, किसान सेवा संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad