जीवननगर पुनर्वसन येथे लोकवर्गणीतून शालेय साहित्य वाटप
तळोदा तालुक्यातील जीवननगर पुनर्वसन येथे लोक वर्गणीतुन तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी क्रमांक एक मध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .बालकांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचे गोडी निर्माण व्हावी,ते नियमित अंगणवाडीत यावे यासाठी बालकांना दप्तर, पाटी पेन्सिल, आय कार्ड यासह साहित्य देण्यात येऊन त्यांना रोज शाळेत येण्याबाबत आवाहन करण्यात आले .
दरम्यान अंगणवाडी सेविका गुलशन पावरा यांनी गावकऱ्यांना आपली ही संकल्पना गावकऱ्यांना बोलून दाखवली होती. गावकऱ्यांनीही या उपक्रमास पाठिंबा देत वर्गणी गोळा करून शालेय साहित्य आणण्यात आले. साहित्य वाटपावेळी वेलजी पावरा ,भिका पावरा, मान्या पावरा, दिलवर सिंग पावरा, मगन वसावे, दिलीप पावरा, जोरदार पटले ,जुहऱ्या पावरा ,उदयसिंग पावरा ,रेहमल पावरा ,रमेश पावरा, कालुसिंग पावरा, भाईदास पावरा, सोमा पावरा ,संजय पावरा ,अंगणवाडी सेविका गुलशन पावरा,मदतनीस मालती पावरा उपस्थित होते.