महाशिवरात्री महात्म्य व रुद्राक्ष महात्म्य कथन
तळोदा शहरातील इंद्रप्रस्थनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्री महात्म्य व रुद्राक्ष महात्म्य याबाबत कथन करण्यात आले .यावेळी सेवानिवृत्त प्रा. भगवान चिने यांनी महाशिवरात्रीचे महात्म्य तसेच रुद्राक्ष महात्म्याचे सविस्तर कथन करीत सांगितले की भगवान शिव अशी देवता आहे की जी फक्त पाणी आणि पाने अर्पण केल्याने आपल्या इच्छा पूर्ण करत असतात. तसेच रुद्राक्ष धारण केल्याने अध्यात्मिक शक्ती प्राप्त होण्यास मदत होत असते, धन सुख समृद्धी मिळून रुद्राक्ष सुरक्षा कवचप्रमाणे काम करत असतो. यावेळी पुरुष महिला बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्म्याच्या कथनानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली.