भागापूर मोठ्या पुलाचे लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते
प्रजिमा 1किमी /100/00 भागापुर गावाजवळ मोठ्या पुलाचे लोकार्पण सोहळा आमदार राजेश पाडवी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले,
यावेळी लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपक पाटील, तर मकरंद पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्याला संबोधित करताना आमदार राजेश पाडवी म्हणाले गाव पाड्यापर्यंत रस्त्याचे झाळे निर्माण करून गावातील व शहरातील अंतर कमी व्हावे प्रवास सुखकर व जलद गतीने होऊन गावातील विकासासाठी हा पूल महत्वपूर्ण ठरणार.
पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड देणारे नदी काठावरील गावांना विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास पाडवी दिला.
कर्यक्रमास पं. स. सदस्य गणेश पाटील,भाजपा कार्यअध्यक्ष डॉ किशोर पाटील, शहराध्यक्ष विनोद जैन,उपसभापती श्रीराम पाटील, सामाजिक कार्यकर्ता दिनेश मराठे ,विजय पाटील,दिनेश खंडेलवाल, विजय चौधरी, योगेश पाटील ,संरपच संजय माळी, विठ्ठल ठाकरे,विठ्ठल बागले,प्रविण वळवी, लड्डु भाई पाटील, भागापुर सरपंच आनिता मोगरे, उपसरपंच निशा दिनेश मराठे, जवखेडा सरपंच एकता सूयेवंशी, गोगापुर उपसरपंच ऋषिकेस पाटील, सावखेडा उपसरपंच मानिस पवार, टुकी सरपंच कैलास मुसलदे, जावदा संजय वाघ ,लोढारा देविदास पवार ,सूतानपुर माहेन मूसलदे , भोगरा दिनेश चौहान, डोगंरगाव उपसरपंच दिलीप पाटील ,हिरालाल पाटील ,शांतीलाल पाटील,शिवाजी चव्हाण, ठाणसिग चव्हाण, परमेश्वर कोळी,सचिन पावरा,कमल पावरा,योगेश पाटील, मानमोडठा सरपंच भोरटेक सुनील पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.