वसमत जवळा खुर्द येथे शिवजयंती निमित्त सप्तखंजरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनपर कार्यक्रम व मराठा सेवा संघ शाखा उद्घाटन सोहळा संपन्न.
शिवजयंती निमित्त जवळा खुर्द येथे दिनांक 24फेब्रुवारी 2023 शुक्रवार रोजी सायंकाळी ठीक 07 ते 10 वाजता सप्तखंजरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनपर कार्यक्रम व मराठा सेवा संघ शाखा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शाखा उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन सप्तखंजरीवादक सत्यपाल महाराज व मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री रमेश सावंत पाटील यांच्या हस्ते झाले.
तर प्रमुख उपस्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बापूराव गरड यांची होती.या कार्यक्रमाचा तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला .
या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती व मराठा सेवा संघ शाखा जवळा खुर्द तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरी डाढाळे, नारायण डाढाळे, राजू सवंडकर ,गजानन डाढाळे कुंडलिक डाढाळे ,गोविंद डाढाळे, राजेश डाढाळे ,सूर्यभान डाढाळे, चंद्रकांत सवंडकर ,सखाराम कटारे, दत्ता डाढाळे, वैजनाथ डाढाळे ,प्रसाद डाढाळे ,कान्हा डाढाळे,बळीराम डाढाळे, गोविंद सवंडकर , सोमाजी लांगे,राजकुमार डाढाळे व इतर गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.
९१ इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी बालाजी पोले वसमत