चर्मकार समाज मंदिरासाठी १० लाख निधी देणार ; आमदार राजेश पाडवी
तळोदा : चर्मकार समाज हा पारंपरिक पद्धतीने आपला व्यवसाय करत असून समाजातील युवक आता उच्च शिक्षण घेवून शासकीय सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. समाजातील जेष्ठांनी युवक युवतींना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे तसेच चर्मकार समाजमंदिर साठी नगर परिषदेने दिलेल्या जागेवर बांधकामासाठी 10 लाख रुपयांची निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले.
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जुनी नगरपालिका समोरील प्रांगणात चर्मकार समाज नवयुवक मंडळ तर्फे प्रतिमा पूजन व भंडारा प्रसादाचे आयोजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, गौरव वाणी, कैलास चौधरी, नंदू जोहरी, योगेश पाडवी, प्रवीण पाडवी, आंबलाल साठे, चर्मकार समाज नवयुवक मंडळ अध्यक्ष प्रकाश जाधव, श्रावण तिजबीज, प्रभाकर अहिरे, गब्बा अहिरे, इंदाबाई तिजबीज, लताबाई तिजबीज,भागाबाई अहिरे, रेखा अहिरे, अनिता अहिरे व समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सुर्यवंशी यांनी केले...