सामाजिक बांधिलकी जपत श्रमदानातून तरुणांनी बांधला वनराई बंधारा.
पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
जव्हार तालुक्यातील जूनिजव्हार ग्रामपंचायत पैकी चौथ्याचीवाडी गावातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत गावाजवळील ओहळावर श्रमदानातून वनरई बंधारा बांधला. गावाजवळ ओहळ आहे, पण हे ओहळ उन्हाळा येताच आटून जाते, पावसाचे पाणी पडल्यावर वाहून जाते, याचा वापर उन्हाळ्यात होत नाही या मुळे नागरिकांना तसेच पशु -पक्ष्याना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागते, यालाच कुठे तरी आळा बसावा तसेच "पाणी आडवा, पाणी जिरवा" ही संकल्पना समोर ठेवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी हा उद्धेश बाळगून सामाजिक बांधिलकी जपत गावातील मुलांनी एकत्र येऊन सिमेंट च्या पिशव्या घेऊन त्यात माती भरून वनराई बंधारा बांधला आहे.
यामुळे जाणावरांना प्यायला पाणी, नागरिकांना अंघोळीला, धुणे-भांडे करण्यासाठी व वापरासाठी या अडवलेल्या पाण्याचा वापर होणार आहे. या सामाजिक कार्याची चहू बाजूने कौतुक होत आहे. या कार्यासाठी गावातील सुशिक्षित तरुण बंटी ठोमरे, महेश सापटा, उत्तम राथड, विशाल सापटा, आकाश सापटा, करन दुमाडा, कल्पेश गरेल, आकाश पाटारा, विष्णू राथड, कर्मराज वड, किरण बांगाड, गुरुनाथ राथड, या सर्वांनी एकत्र येऊन बांधरा बांधला आहे.