त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाड येथे शिवजयंती निमित्त कार्यक्रम
तळोदा:- विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था, तळोदा संचलित त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाड येथे शिवजयंती निमित्त कार्यक्रम संपन्न. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य किरण वळवी होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमापूजनाने झाली. विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. निकिता पाडवी, अवंतिका पाडवी, कीर्ती मराठे, शितल दाबी, राजेश्वरी पाडवी या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनाचे वेगवेगळे सांगितले प्राध्यापिका रामेश्वरी बत्तीसे यांनी शिवाजी महाराज जयंती विषयी महाराजांबद्दल कविता गायली नंतर प्राध्यापिका अश्विनी माळी यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील पुरंदरचा तह व त्याविषयी सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर प्राध्यापिका आरजू पिंजारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयीचे प्रसंग व त्यांच्या अंगी असलेले गुण याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य किरण वळवी यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र व शिवाजी महाराजांच्या अंगात असलेले धाडस हे आपण सर्वांनी आत्मसात करायला हवे याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री गोसावी या विद्यार्थिनीने तर आभार प्राध्यापिका रामेश्वरी बत्तीसे यांनी मानले कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने झाली.