रस्ते प्रश्नी आमदार जयराम गामीत यांना तळोदा परिसरातील विविध संस्थेमार्फत निवेदन
तळोदा येथील विविध संस्थांमार्फत रस्त्यांचा दुर्दशा प्रश्नी व्यारा बारडोली निझर मतदार संघ आमदार, डॉ जयराम गामीत यांना महाराष्ट्र हद्दीलगत गूजराथचे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
तळोदा- वाका चार -नंदुरबार, तळोदा -सदगव्हाण , प्रकाशा रस्ता नादुरुस्त झाला असून वाहन चालविणे योग्य नाही.म्हणून ग्राहक पंचायत जिल्हा नंदुरबार, प्रदेश प्रवासी महामंच, सहयोग सोसल गृप, व्यापारी महासंघ तळोदा, मेडिकल असोसिएशन तळोदा, डॉक्टर असोसिएशन तळोदा,
आदींनी संयुक्त निवेदन दिले आहे.
निवेदनाचा आशय असा,आम्ही आपणास विनंती करतो की नंदुरबार हे जिल्ह्याच्या ठिकाणी असून शाळा, कॉलेज, व्यापार, वैद्यकीय,सुविधा व इतर सरकारी कामांच्या प्रयोजनार्थ तळोदा, धडगाव, मोलगी सह लगतच्या गुजरात राज्यातील जनतेस विविध कार्य प्रयोजनार्थ सदैव जा- ये करावी लागते. मात्र नंदुरबार जातांना गुजरात हद्दीतील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे कठीण झाले असून गर्भवती महिला आजारी, वृद्ध, विद्यार्थी इ प्रवासींना प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.खड्ड्यामुळे अपघाताने व आजारांनी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.गुजरात सह महाराष्ट्रातील जनतेची हा रस्ता व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून मागणी आहे जनतेने अनेकदा निवेदन दिले असून अनेकदा आंदोलन देखील केले आहे परंतु आश्वासन खेरीज पदरी काही पडलेले नाही. गुजरात व महाराष्ट्र सीमा जवळ जवळ असून औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, दळणवळण दृष्ट्या हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे गुजरात राज्यात आपल्या पक्षाचे कल्याणकारी सरकार अस्तित्वात आहे आपल्या सरकारकडून विविध कल्याणकारी विकासाची कामे होत आहेत. तरी आपणास विनंती की या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. या रस्त्याच्या कामी आवश्यकता भासल्यास केंद्र सरकार कडे ही पाठपुरावा अशी आपणास विनंती आम्ही विविध समाज सेवाभावी संघांच्या वतीने करीत आहोत.तरी कृपया आपण तातडीने या निवेदनाची दखल घेऊन रस्त्या कामाची लवकरात लवकर सुरुवात करावी अशी विनंती करण्यात आली आहे.निवेदनावर प्रा संजय शर्मा, रमेशकुमार भाट,
अँड अल्पेश जैन,पंडित भामरे,
व्यापारी महासंघाचे आनंद सोनार,
प्रा आर ओ मगरे उपस्थित होते.