Type Here to Get Search Results !

यारी दोस्ती ग्रुप कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक उपक्रम साजरा.



यारी दोस्ती ग्रुप कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक उपक्रम साजरा.


 जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर 


 दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी, डहाणू तालुक्यातील आशागड येथील चरी कोटबी (खिंडपाडा) ह्या जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित यारी दोस्ती फाऊंडेशन पालघर कडून शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण जगभर साजरी करत असताना यारी दोस्ती ग्रुप ने या दिवशी शाळेत जावून विद्यार्थ्यांना सोबत घेवून जयंती साजरी केली. सदर शाळेला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देवून त्या विद्यार्थ्यांना महाराजांबद्दल त्यांच्या इतिहास, युद्धनीती, अर्थनिती, पर्यावरण नीती या संदर्भात माहिती देण्यात आली.

या शाळेतील कु. लाडक्या पालकर हा विद्यार्थी १ ते १५० पर्यंत तोंडी पाढे बोलतो आहे. हे त्यांचे वैशिष्टे लक्षात घेवून त्या विद्यार्थ्याला ग्रुप कडून सन्मान चिन्ह, स्कूल बॅग, वही, पेन, कंपास बॉक्स इत्यादी साहित्य एक छोटीची मदत म्हणून देवून गौरविण्यात आले.

या एवढ्या हुशार विद्यार्थ्याला आई नसून तो त्यांच्या आजी आजोबा कडे राहून या गरिबीच्या कठीण परिस्थितीतून अभ्यास करून आपले व आपल्या शाळेचे नाव मोठे करतोय हे खूपच कौतुकास्पद आहे.

तसेच या शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या आणि पेन आदी साहित्य वाटप केले, आणि कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्याना चोकलेट वाटप केले.

सदर कार्यक्रमात चरी कोटबी गावातील मान्यवर, शाळेचे शिक्षक श्री. अंकुश दडे सर, श्री. विशाल कदम सर आणि यारी दोस्ती फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. शाळेतील सरांनी सदर शाळेत शैक्षणिक उपक्रम राबविला यारी दोस्ती फाउंडेशन चे खूप खूप आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad