वाडा मांगरूळ येथे वनव्याने लागलेल्या आगीत घर बेचिराख.
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मांगरुळ येथील दिनांक १६/०२/२०२३ ठीक दुपारी१ -००वाजता लागलेल्या वणव्यात मांगरुळ पैकी फणसपाडा गावातील श्री चिंतामण हरी बरफ या ग्रामस्थ पूर्ण घर जळाले आहे ,त्यात त्याचे आधार कार्ड इतर सर्व पेपर पूर्णपणे जळाले ,तांदूळ, व ३०,०००रुपये , २.५०किंटल भात असे भरपूर आवश्यक असनाऱ्या वस्तू जाळून नष्ट झाल्या आहेत. आगीत पूर्णपणे बेचिराक झाले आहे.
वाडा तालुका हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी जास्तीत जास्त बेरोजगार बघायला मिळत असल्याने चिंतामण हरी बरफ याने एक छोटंसं घर हे काबाडकष्ट करून तयार केले होते परंतु त्यातच घराला आग लागल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
ही आग वनव्याने लागलेली असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने त्याचा पंचनामा केला आहे. त्या पंचनामेची लवकरात लवकर दखल घेऊन शासनाने मदत करावी सदर ग्रामस्थांची मागणी आहे.