सुवर्णपदक कमवणाऱ्या सोनू सोमणचे शाळेत ढोल ताशाच्या गजरात स्वागत.
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मुरबाड येथील आदिवासी विकास विभाग अंतर्गत नाशिक इथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा मुरबाड तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या कुमार सोनू रघल्या सोमान हिने उंच उडी खेळात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सुवर्णपदक मिळवून शाळेचे व जव्हार प्रकल्पाचे नाव उंचावले आहे. तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचे वर्षाव होत आहेत. तसेच शाळेने ढोल व ताशाच्या गजरात स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापक व्ही .जी. खोटरे, क्रीडा शिक्षक दीपक राठोड, वर्गशिक्षक के .आर .कनोजा, त्यांच्यासोबत ए. एस. टोपले, जी. एस. सातवी, एस एस माळी, एस डी कडू, ए .एस .गुहे, एस. बी. विलात, मदन काटकरी, देवराम साठे, राहुल भोये, अमोल खाडे, जी .डी. पगार, एन. व्ही. चाबके,व्ही .डी .पढेर, जी. डी. पगार , तुषार मलावकर, सुवर्णा कोंब, समीक्षा रावते, प्राची वावरे, डी .एम .तांबडा, वर्ग ४ चे कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.