Type Here to Get Search Results !

नंदुरबार चोरीस गेलेली रिक्षा व आरोपीस 12 तासाचे आत जेरबंद करण्यास पोलीसांना यश



नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेली रिक्षा व आरोपीस 12 तासाचे आत जेरबंद करण्यास नंदुरबार शहर पोलीस ठाणेला यश


नंदूरबार (प्रतिनिधी):-तक्रारदार रमेश मगन कुवर, वय 36 वर्ष, धंदा रिक्षा चालक राहणार दरीपाडा पोस्ट आमरपाटा, ता. साक्री, जि. धुळे हे जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे उपचारासाठी आले असता त्यांनी त्यांचे मालकीची 50,000 रुपये किंमतीची अतुल GEM कंपनीची रिक्षा क्रमांक GJ-19-0293 ही जिल्हा रुग्णालयाचे गेट समोर पार्क करून ठेवली होती. सदरची अॅपेरिक्षा ही दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 14:00 वाजेचे सुमारास जिल्हा रुग्णालयाचे गेट समोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणून ते दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी आले असता, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं. 98/ 2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा हा वाहन चोरीशी निगडीत असल्यामुळे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेश दिला. नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या अपेरीक्षाबाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली. तसेच चोरीस गेलेल्या अँपेरीक्षाच्या शोधासाठी 02 पथके तयार केली. नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना एक इसम हा चोरीची रिक्षा नंदुरबार शहरालगत असलेल्या पातोंडा ते होळ रस्त्यालगत फिरत असलेबाबत माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सांगीतली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना तात्काळ मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी रवाना करुन सदर इसमाचा शोध घेण्यास सांगीतले. गुन्हे शोध पथकाने पातोंडा ते होळ रस्त्या दरम्यानच्या सापळा रचला असता संशयीत आरोपी हा एका अँपेरीक्षासह येत असतांना दिसुन आला. पोलीस पथकाने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता परंतु संशयीत आरोपी हा अँपेरीक्षासह पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे ताब्यात असलेल्या अपेरीक्षाबाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यानंतर त्यास नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आणुन विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचे नाव विजय जयंता वळवी, वय 23 वर्षे राहणार खडकी, ता. अक्कलकवा, जि. नंदुरबार असे सांगितले. तसेच त्याचेकडील अॅपेरिक्षा ही त्याने नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालयाचे गेट समोरुन चोरी केल्याची माहिती दिली. त्याचेकडील 50,000 रुपये किंमतीची अतुल GEM कंपनीची अॅपेरिक्षा क्रमांक GJ-19-0293 ही कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केली.

अशाप्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पथकाला 50,000 रुपये किंमतीची अतुल GEM कंपनीची रिक्षा क्रमांक GJ-19-0293 ॲपरीक्षा हस्तगत करण्यात यश प्राप्त झाले आहे. तसेच आरोपीतास अटक करण्यात आली व त्यास पोलीस कोठडी मिळाली असुन सदर गुन्हयात आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आरोपीकडुन नंदुरबार जिल्हयातुन चोरी गेलेले इतर वाहने हस्तगत होवु शकतात असे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले आहे. सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोहेकॉ संदिप गोसावी, पोना. नरेंद्र पाटील, पोना. स्वप्निल पगारे, पोशि. विजय नागोडे, पोशि. युवराज राठोड, पोशि. योगेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad