तळवे येथे घरफोडीत 86,450 रुच्या ऐवज लंपास, अज्ञात विरोधात गुन्हा
बंद घराचा कडी कोयंडा तोंडुन प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड 86,450रु ऐवज लंपास केल्याची घटना तळोदा तालुक्यातील तळवे येथे घडली पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे
या बाबत पोलीस सुत्रांकडुन प्राप्त माहिती अशी कि तळोदा तालुक्यातील तळवे येथील नारायण जगन्नाथ गायकवाड व घनश्याम जगन्नाथ गायकवाड हे दोघे बंधू आपल्या संपूर्ण कुटुंबास लग्नासाठी घराला कुलूप लावून नवापूर येथे गेले होते त्यांची हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घराचा पुढील दरवाजाकडे कोंडा करून आप प्रवेश केला घरातील दोन्ही कपाटे तोडून त्यात ठेवलेले सोन्याची चैन सोन्याची अंगठी लहान मुलींचे चांदीचे दागिने सुमारे 86450 ऐवज चोरून नेला गावातील पोलीस पाटलांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली या बाबत नारायण जगन्नाथ गायकवाड यांनी फिर्याद दिली तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे पुढील तपास पोसई प्रिया वसावे करीत आहे