तळोदा येथे महाशिवरात्रीच्या पवन पर्व निमित्त 'सनातन धर्म जनजागृति ' अभियान
तळोदा:- प्रजापिता ब्रह्मा कुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालय, तळोदा येथे महाशिवरात्रीच्या पवन पर्व निमित्त 'सनातन धर्म जनजागृति ' अभियान राबीविण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य अतिथि म्हणून तळोदा / शहादा मतदार संघाचे,राजेश पाड़वी , भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष योगेश चौधरी , माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
तसेच कन्या विद्यालचे अध्यक्ष चेतन पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अजय सोनवणे, माजी नगराध्यक्षा वंदना ताई मगरे, व बहुरूपा येथील पटेल समाजाचे ,प्रतिनिधि - डॉ. कांतिलाल पटेल यांचे अनोमोल सहकार्य व सहभाग होता.
कार्यक्रमा चे उद्घाटन महाशिवरात्रि निमित्त 'अंधकारा कडून उजेडा कड़े' अर्थात 'आत्मा चेतना चे आत्मा चैतन्य कड़े' चे दीप प्रज्वलन करून करण्यात आले. महाशिवरात्रि च्या या महान पर्वा बद्दल आमदार राजेश पाड़वी यांनी जनजागृति करताना सांगितले की, जसे अंधार असला तर आपण उजेड करण्यासाठी दिवा लावतों तसे , आज च्या वर्तमान समई आपल्या अत्म्या मध्ये जे अवगुण अर्थात अंधकार झालेला आहे. तो आपण आज प्रजापिता ब्रह्यमकुमारी ,तळोदा यांचे माध्यमातून दीप प्रज्वलन करून अवगुनातून सुगुणा कड़े अर्थात अंधकरातून प्रकाशा कड़े जाण्याचा सर्वांनी दृढ़ संकल्प करायचा आहे. असे आव्हान सर्व उपस्थित शिव प्रेमिना करण्यात आले.
तसेच 'सब का मालिक एक है ' दलेलपुर येथील ब्रह्मा कुमारिं नी सादर करून 'वसुदेव कुटुंबम' हाच 'सनातन धर्म ' आहे. हा मोला चा शिव संदेश दिला. शिवा चे तांडव नृत्य ब्रह्मा कुमारी समीक्षा हिने सादर करून सर्वांच मंत्रमुग्ध केले.
प्रजापिता ब्रह्मा कुमारि , तळोदा च्या संचालिका, बी. के. सरला दिदी यांनी, महाशिवरात्रि चे व परमात्मा चे महत्व स्लाईड शो द्वारे सर्व शिव प्रेमिंना समजविले.
महाशिवरात्रि च्या आत्मा जागृति साठी गाँव बोरद येथे दिनांक १२ व १३ फेब्रुवारी २०२३ रैली काढण्यात आली या जनजागृति अभियानात बोरद गाँव चे सरपंच, श्रीमती अनीता भीलाव व माजी सरपंच , श्रीमती. वासंती ताई नरहर ठाकरे यांचे सहकार्य लाभले. दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२३ येथे ही 'सनातन धर्म जन जागृति' रैली काढून प्रजापिता ब्रह्मा कुमारिज तर्फे जनजागृति करण्यात आली. रैली साठी सर्वच ब्रह्मा कुमार व ब्रह्मा कुमारिज यांचे सहकार्य लाभले.