लोहोणेर येथे भगवान वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे माहदंडनायक भगवान वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
लोहोणेर येथील वीर एकलव्य मित्रमंडळ आणि शिवालय मित्र मंडळाने एकलव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा अनुसूचित जमाती आघाडीचे तालुकाध्यक्ष सोपान सोनवणे तसेच पुरातन महादेव मंदिर येथे लोहोणेरचे सरपंच धोंडू आहिरे यांनी वीर एकलव्य भगवान प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर एकलव्य प्रतिमेची वाजत गाजत आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून लोहोणेर येथे मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होवून आदिवासी गाण्यावर ठेका धरत होत्या..
महाशिवरात्री आणि एकलव्य जयंतीनिमित्त
भाजप अनुसूचित जमातीचे तालुकाध्यक्ष यांनी विठेवाडी येथील एकलव्य मित्रमंडळास, लोहोणेर येथील समाज बांधवांना वीर एकलव्य भगवानच्या प्रतिमा भेट दिल्या यावेळी सरपंच नानाजी पवार, राजेंद्र निकम, गणेश निकम, विलास पवार, राजेंद्र वाघ, सुनिल पवार, समाधान काकुळते, आबा पवार, सागर मोरे, लखन सोनवणे, दिपक गायकवाड, दिपक मोरे, महेंद्र बोरसे, शिवदास वाघ, लखन वाघ, पप्पू जाधव, सुनिल वाघ, सुनिल मोरे, विशाल वाघ, राकेश पवार, दत्तु वाघ, सावन पवार, समाधान जाधव, विकास गायकवाड, अतुल जाधव,प्रशांत पवार, सचिन सोनवणे, मनोज गायकवाड, दोधा माळी, अरुण जाधव, शंकर पवार, शंकर माळी, बबलू सोनवणे, सोनु पिपंळसे शुभंम माळी, समाधान आहिरे, प्रकाश सोनवणे, लक्ष्मण पवार गुलाब पवार, अशोक वाघ, हुसेन पवार, रामदास गांगुर्डे, जितेंद्र जाधव, राजेंद्र माळी, सागर सुनिल पवार, निंबा आहिरे, निलेश पवार, दादा पवार, अजय आहिरे, गणेश गांगुर्डे, प्रविण पवार, प्रशांत माळी, राकेश गायकवाड, गणेश जाधव, काशिनाथ पवार, अतुल पवार इतर, समाज बांधव, मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते..