तळोदा तालुक्यातील महात्मा फुले समाजकार्य MSW व मात्रोश्री झवेरी बेन मोतीलाल तुरखिया BSW महाविद्यालयातील MSW प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे नुकतेच धवळीवीर गावात ग्रामीण आरोग्य शिबिराचा निरोप समारंभ कार्यक्रम अतिशय छान हऱ्हेने पार पडला. पाच दिवसीय या श्रम शिबीरात विविध विषयांवर चर्चा आणि प्रबोधन सत्र विविध उपक्रम राबवण्यात आली होती. सामाजिक मुद्यांवर व विद्यार्थांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी त्या त्या नियोजित विषयावर अनेक तज्ञ मार्गदर्शन या पाच दिवसात विद्यार्थांना मिळाले.
या निरोप समारंभ कार्यक्रमात महाविद्यालचे माझी विद्यार्थी युवा कवी साहित्यिक आणि आदिवासी एकता परिषद चे कार्यकर्ते संतोष पावरा विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच लोक नियुक्त सरपंच सपना वसावे, तळोदा कॉलेज ट्रस्ट चे पदाधिकारी मा. निखिलभाई तुरखिया, महाविद्यालयाचे प्राचार्या प्रा. यु बी वसावे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष दारासिंग वसावे, विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. निलेश तायडे, डॉ. प्रमोद जावध, संजय पटले, प्रा. रामचंद्र परदेशी गावातील ज्येष्ठ नागरिक आदी विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी, कवी संतोष पावरा यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, " संकुचित ध्येय देशासाठी घातक आहे. विद्यार्थांनी मोठा ध्येय ठेवला पाहिजे आणि त्यासाठी कठोर मेहनत घेतले पाहिजे. खऱ्या समाजकार्यकर्त्याची देशाला गरज आहे. पण आपले शिक्षण नोकरी पुरते मर्यादित राहू देऊ नका ! समाजासाठी समाजकार्य शिक्षण करा" असे आवाहन विद्यार्थांना केले. वाचन संस्कृती विद्यार्थांनी जोपासली पाहिजे. पुस्तके चांगला मार्ग दाखवत असतात. असे मत निखिल भाई तुरखिया यांनी व्यक्त केले. तसेच प्रा. यु. बी वसावे, संजय पटले सर, प्रा. नितीन तायडे व डॉ.जाधव सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी विद्यार्थांनी आपल्या पाच दिवसाच्या शिबीरातील दिवसाचे अनुभव व्यक्त केले. काहींनी काहींनी गावाचा इतिहास सांगून दाखवले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचान व आभार महाविद्यालातर्फे शिबीरातील विद्यार्थांनी केले होते.