Type Here to Get Search Results !

औषधसाठा उपलब्ध असतांना रुग्णांना बाहेरुन औषध विकत घ्यायला लावण्याचे प्रकार तात्काळ थांबवा - आ. किशोर जोरगेवार


औषधसाठा उपलब्ध असतांना रुग्णांना बाहेरुन औषध विकत घ्यायला लावण्याचे प्रकार तात्काळ थांबवा - आ. किशोर जोरगेवार

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाची पाहणी

राजेंद्र मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी


 चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. रुग्णांचे समाधान होईल अशी वागणूक आपण ठेवली पाहिजे. रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतांनाही त्यांना बाहेरुन औषध विकत आणायला सांगणे हा अतिशय चुकिचा प्रकार असुन हे प्रकार तात्काळ थांबवा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला दिले आहे.       
  आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडु रामटेके, उप निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदेकर, डॉ. तेजस्वीनी चौधरी, डॉ. रोहित होरे, डॉ. प्रशांत मगदुम, डॉ. ऋतुजा गनगारडे यांच्यासह महिला शहर संघटिका वंदना हातगावर, युवती तथा वैद्यकीय सेवा प्रमुख भाग्यश्री हांडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राशेद हुसेन, विश्वजीत शाहा, देवा कुंटा, बबलु मेश्राम, रुपा परसराम, दुर्गा वैरागडे, आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad