शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील भोई समाजाच्या तरुणावर शिरपुरात प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारून खून करणाऱ्या गुंडांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी अक्कलकुवा तालुक्यातील भोई समाज बांधवांनी निवेदनात केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील भोई समाज बांधवांकडून अक्कलकुवा तहसीलदार, पोलीस निरीक्षक व विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांच्या सह मुख्यमंत्री, पालक मंत्री यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, दि.04/02/2023 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता काही समाज कंटक गांवगुंडांनी आमच्या 'भोई समाजातील चि. राहुल राजू भोई वय वर्ष 22 रा. शिंगावे ता. शिरपूर जिल्हा धुळे याच्यावर शिरपूर शहरात प्राणघातक हल्ला करून धारदार हत्याराने भोसकून निर्घुणपणे खून केलेला आहे. तरी हि घटना आमच्या समाजच नव्हे तर सर्वच स्तरातील समाजाला काळीमा फासणारी घटना आहे तरी या हृदयद्राव्यक घटनेचा लवकरात लवकर सखोल तपास करून गुंड प्रवृत्तीच्या खुनाचे सर्व मारेकरी आरोपींना तत्काळ अटक करून फास्ट ट्रैक कोर्ट मध्ये सदर खटला चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी. अन्यथा सदर प्रकरण हाताळण्यात दिरंगाई झाली असे आढळल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर भोई समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे.
तरी महोदयांनी या बाबत लवकरात लवकर संबंधित यंत्रणेला योग्य ते आदेश देऊन तत्काळ योग्य ती कार्यवाही करून पीडित गरीब कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा निवेदन देतांना
यावेळी नंदुरबार जिल्हा भोईसमाज सेवा संघ जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण वाडीले, रविंद्र वानखेडे, अमृत तावडे,किशोर ढोले,राजाराम नुक्ते,भगवान मोरे,लक्ष्मण मोरे, रवी सोनवणे,केतन वाडीले,योगेश साठे सह भोईसमाज बांधव उपस्थित होते