याबाबत निवेदनात म्हटले आहे कि, अक्कलकुवा आगार अंतर्गत तळोदा बस स्थानकातून बस फेऱ्या चालतात तळोदा ते नंदुरबार जाणे साठी दुपारी 11 ते 2 वाजेच्या दरम्यानच्या बस फेऱ्या बंद असतात या काळात चालक नाही, वाहक नाही असे सांगितले जाते. त्यामुळे अक्कलकुवा आगार प्रमुखांनी लक्ष घालावे या वेळेत बस फेऱ्या सुरळीत सुरू ठेवाव्यात तसेच एक फेरी अक्कलकुवा डेपोची असावी व एक फेरी नंदुरबार डेपोची असावी. जेणे करून वेळेत बस उपलब्ध होईल प्रवास सुखकर होईल. तसेच वेळेचे योग्य ते नियोजन करावे काही वेळेस दोन दोन तास बस नसते. तसेच अक्कलकुवा आगार तसेच एस. टी. स्टॅण्ड वर असलेले फोन बऱ्याच वेळा नादुरुस्त असतात त्यामुळे त्यांचेशी संपर्क होवु शकत नाही. ते सुस्थितीत ठेवण्याची व्यवस्था करावी. अक्कलकुवा डेपोला एकच बस स्टॅण्ड संलग्न आहे. तरी या मार्गावरील सर्व बसेस सुस्थितीत ठेवण्याचे नियोजन करावे.आगार प्रमुखांना नियंत्रकांना सूचना करावी अशी मागणी निवेदनात आमदार राजेश पाडवी यांच्याकडे प्रहार संघटनेने केली आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी गौरव वाणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष मंगलचंद जैन , हिरकण भोई, आदी उपस्थित होते
तळोदा ते नंदुरबार बस फेऱ्या दुपारी 11 ते 2 वाजेच्या सुमारास चालू करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्याकडे निवेदन
सोमवार, फेब्रुवारी ०६, २०२३
0
तळोदा बस स्थानकातून तळोदा ते नंदुरबार बस फेऱ्या दुपारी 11 ते 2 वाजेच्या सुमारास नसल्याने प्रवाश्यांची गैरसोय होत आहे याप्रश्नी प्रहार संघटनेतर्फे आमदार राजेश पाडवी यांच्याकडे निवेदनात केली आहे.