ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालय, माळवाडी यांच्या तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील माळवाडी येथे सावित्रीबाई फुलें यांची जयंती काल अतिशय उत्साहात साजरी झाली.
यावेळी गावातील सावित्रीच्या लेकींना शाल व गुलाबकुंज देऊन सत्कार करण्यात आला. नवलाबाई दोधू गोसावी, मुलकनबाई सुरेश शेवाळे, सविता देविदास बागुल, विमलबाई माणिक अहिरे, कुमारी देवयानी दावल भदाणे, सगुनाबाई दादाजी बागुल, पार्वताबाई महादू जाधव, मिराबाई रमन भदाणे यांचा त्यांच्या जीवन संघर्षातून केलेल्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला व सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महात्मा फुले विद्यालय माळवाडी चे मुख्याध्यापक सोनजे सर, गुप्ते सर, सावंत मॅडम सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी हजर होते. तसेच सरपंच शिवाजी बागुल, ग्रामसेवक देवरे भाऊसाहेब, पोलिस पाटील वाघ मॅडम, फुले माळवाडी ग्रामसेविका सोनार मॅडम, हर्षाली बच्छाव, अर्चना खैरे, माधुरी बागुल, सुमन बागुल, उर्मिला सोनवणे, मिराबाई गोसावी, अर्चना खैरे, रिंकूबाई बच्छाव, मंजुळाबाई बागुल, माधुरी बागुल, सखुबाई बागुल, मनीषा शेवाळे, सरला शेवाळे, सोजाबाई आहेर तसेच ग्रा. प. सदस्य निकेश जाधव, ग्रा.प. सदस्य तुळशीराम बच्छाव, हेमंत बागुल, मा. सरपंच सुरेश बागुल, विलास शेवाळे, रमेश बागुल, सुभाष बागुल, तुकाराम बागुल, सुनील वाघ, कैलास बागुल, अनिल गोसावी, दिनकर भदाणे, दावल भदाणे, संजय खैरे, संजय सोनवणे, सुपा आण्णा, निंबा कृष्णा, स्वामी भदाणे, माऊली भदाणे, सचिन शेवाळे, आदेश गोसावी इ. नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील बागुल यांनी केले तर सुत्रसंचलन प्रेमानंद बागुल यांनी केले.