दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थांची निवड
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील दहिवड येथील केंद्र शासनाच्या इनस्पायर ऑवर्ड योजनेंतर्गत आपल्या जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवड येथील कु.खुशी प्रवीण देवरे व श्रध्दा समाधान सोनवणे यांची निवड झाली.
सदर विद्यार्थीनीं विज्ञान प्रयोग तयार करून नासिक येथे सादर करायचा आहे.देवळा तालुक्यातील फक्त सहा शाळेतील विद्यार्थ्यांचीं निवड झाली त्यात कौतुकाची व अभिमानाची बाब म्हणजे आपल्या जिजामाता माध्यमिक विद्यालयातील दोन मुलींची निवड झाली.आज सदर विद्यार्थ्यांच्यां पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने नासिक येथील थर्ड आय एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी नासिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय श्री.प्रवीण पाटील साहेब उपस्थित होते.
सदर विद्यार्थ्यांचें गिरीजा अभियान संस्थेच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई आहेर, जिल्हा नेते व संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय श्री. केदानाना आहेर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुनिल शिंदेसर यांनी सदर विद्यार्थ्यांनींचे कौतुक करुन अभिनंदन केले.सदर विद्यार्थीनींना विज्ञान शिक्षक श्री.व्हि.जी.सागर व श्री.एस.के. आहेर सर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.सदर शिक्षकांचे सुध्दा मनापासून कौतुक व अभिनंदन. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी सदर विद्यार्थ्यीनींचे कौतुक करुन अभिनंदन केले.