Type Here to Get Search Results !

शालेय विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कडून शैक्षणिक व सांस्कृतिक वाद्य साहित्यांचे वाटप



शालेय विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कडून शैक्षणिक व सांस्कृतिक वाद्य साहित्यांचे वाटप


प्रतिनिधी मोखाडा :सौरभ कामडी 



पालघर(मोखाडा)आज दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे ग्रुप ग्रामपंचायत कोचाळे कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक वाद्य साहित्याचे वाटप करण्यात आले. दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या क्रीडा साहित्य बरोबर वाद्य साहित्यांबरोबर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपली कला प्रगत करत पुढे जावे या अनुषंगाने कारेगाव कोचाळे ग्रुप ग्रामपंचायत कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक वाद्य साहित्यांची वाटप करण्यात आले. व शैक्षणिक अडचण असल्यास अवश्य संपर्क करा योग्य ती मदत ग्रामपंचायत कडून करण्याचा प्रयत्न करू असे सरपंच यांनी सांगितले. कारेगाव कोचाळे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच देवराम कडू व यांचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक फसाळे सर यांनी आभार मानले यावेळेस ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच देवराम कडू, उपसरपंच हनुमंत फसाळे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बदादे,ग्रामस्थ व शिक्षक वृंद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News