वेलीमाता आश्रमशाळेचे उपकरण तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथीत सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात वेलीमाता आश्रमशाळेच्या उपकरणाला मोठ्या गटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळाले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अक्कलकुवा तालुक्यातीत सर्व माध्यमाच्या शाळा, आश्रमशाळांनी विविध प्रकारच्या उपकरणांची मांडणी केली. प्रदर्शनात वेलीमाता आश्रमशाळेचे थ्रीडी होलोग्राम प्रोजेक्टर या उपकरणाला मोठ्या गटातून प्रथम पारितोषिक मिळाले, उपकरणाचा वापर करून अध्यापनातील विविध त्रिमितीय संकल्पना स्पष्ट करता येतात. व विद्यार्थ्यांचे अवधान टिकवून परिणामकारक अध्यापन शक्य होते. प्रदर्शनात अतुत वळवी, ओल्या तडवी, शंकर नाईक, गिरीश वसावे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला उपकरण निर्मितीसाठी शाळेचे विज्ञान शिक्षक दिलिप सूर्यवंशी, ऋत्विकसिंग राजपूत, हारून पिंजारी, तिसराम पावरा, महेंद्र पराडके यांनी परिश्रम घेतले.
यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक विज्ञान शिक्षकांचे शाळेचे अध्यक्ष कांतिलाल टाटीया, सचिव संजय टाटीया, संचालक वाण्या वळवी, मुख्याध्यापक संदीप पवार, नितीन पाटील आदींनी कौतुक केले.