मनमानी,बेजबाबदार वागून, विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या अधीक्षक, प्रभारी मुख्याध्यापक यांची चौकशी करा-बिरसा फायटर्स
शासकीय माध्य.व उच्च माध्य.शाळा भांगरापाणी ता.अक्कलकुवा येथील अधीक्षक/प्रभारी मुख्याध्यापक यांची चौकशी करण्याची मागणी बिरसा फायटर्सने प्रकल्प अधिकारी तळोदा यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,विद्यार्थी तक्रार घेवून आले तर माझे काय करून घेणार असे शब्दप्रयोग करणे,निवासी विदयार्थ्यांना मुद्दाम घरी पाठवून शैक्षणिक नुकसान करणे,निवासी विदयार्थ्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करणे असे बेजबाबदार कृत्य करत असल्याचे तक्रार पालकांची संबंधित कर्मचाऱ्यांची आली होती.अधीक्षक(व्यवस्थापक)असतांना प्रभारी मुख्याध्यापक पद का दिले?तेथील वरिष्ठ शिक्षकांला का दिले नाही?असाही प्रश्न उपस्थित होत आहे.अनेक वर्षे एकाच ठिकाणी व मनमानी कारभार करतात;याचा अर्थ प्रकल्पातील एखाद्या अधिकाऱ्यांचे वरदहस्त आहे का?पोषण आहारात भ्रष्टाचार होतो का? असे अनेक प्रश्न निवेदनातून उपस्थित केले आहे.संबंधित कर्मचाऱ्यांचे एक पद तात्काळ काढून घ्यावे व चौकशी करून,दोषी आढळल्यास कारवाई करण्याची मागणी केली आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष भरत पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,गंगानगर शाखाध्यक्ष रायसिंग पाडवी,देवीलाल ठाकरे,अँड.सखाराम ठाकरे यांच्या सह्या आहेत.