नायब तहसीलदार तळोदा यांना धनगर समाजाला आदिवासीत समावेश करू नये यासंदर्भात निवेदन देतांना...
आदिवासींत धनगर समाजाला घुसविण्याचा असंवैधानिक मागणीला तीव्र विरोध (धनगर आदिवासी नाहीत.धनगर ही जात आहे.जमात नाही.)
तळोदा:- आदिवासींत धनगर समाजाच्या समावेश करण्यास असंवैधानिक मागणी विरोध करत, आदिवासींत धनगर समाजाचा समावेश करू नये यासाठी बिरसा फायटर्सने तहसीलदार तळोदा मार्फत पंतप्रधान, राष्ट्रपती यांना निवेदन पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की,धनगर व धनगड ही दोन्ही शब्द अनुसूचित जमातीच्या सूचित नाहीत. 'Dhangad' या शब्दांचे भाषांतर धनगड असे केले जात आहे.ओरॉंन,धांगड या जमातीशी धनगर जातीची तीळमात्रही संबंध नाही.धनगर ही जात आहे;जमात नाही.धनगर आदिवासी नाहीत.धनगर समाजाला घटनेनुसार ३.५% स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे.धनगर समाज एक सधन,व शहरी भागात राहणार आहे.आदिवासींची संस्कृती ही विशिष्ट व स्वतंत्र आहे.आदिवासी जीवनशैली,संस्कृती,रीतीरिवाज,रूढीपरंपरा,भाषा स्वतंत्र आहे.धनगर समाज आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही.राजकीय फायद्यासाठी काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधीकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीत घुसविण्यासाठी असंवैधानिक मागणी करतांना दिसत आहे.आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक हक्क असून त्यामध्ये कोणत्याही अन्य जातीची समावेश करू नये.अन्यथा,बिरसा फायटर्स व आदिवासी संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,जिल्हाध्यक्ष भरत पावरा,जिल्हा संघटक यशवंत वळवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,रोझवा पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा,रापापूर,पाल्हाबार शाखाध्यक्ष शिवाजी तडवी,सहसचिव सतीश पाडवी,गणेश पाडवी, संदीप खर्डे,झिंगा पावरा,रायसिंग पाडवी यांच्या सह्या आहेत.
'धनगर ही जात आहे;जमात नाही.ओरॉन,धांगड जमातीची धनगर जातीची तीळमात्र संबंध नाही.धनगर आदिवासी नाही.धनगर समाज आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही.धनगर समाजाला स्वतंत्र ३.५ टक्के आरक्षण असतांना देखील काही लोकप्रतिनिधीकडून राजकीय फायद्यासाठी असंवैधानिक मागणी करतात.या असंवैधानिक मागणीला बिरसा फायटर्सचा तीव्र विरोध आहे.'
- राजेंद्र पाडवी, राज्य महासचिव बिरसा फायटर्स