तळोद्यातील गो. हू. महाजन हायस्कूल 1988 च्या दहावी बॅचचे सवंगडी 35 वर्षानंतर एकत्र.
तळोदा- शाळेने दिलेली शिकवण, केलेले संस्कार,व सकारात्मक इच्छाशक्ती ही सर्व शिदोरी घेऊन आतापर्यंत यशस्वीरित्या केलेल्या वाटचालीबद्दल गुरुजनांप्रती तसेच शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, सोबत शिकणाऱ्या तत्कालीन सवंगड्यांसोबतचे मैत्रीचे धागे अधिक घट्ट करण्यासाठी तब्बल 35 वर्षानंतर तळोद्यातील गो. हू. महाजन हायस्कूलमधील सन 1988 च्या दहावीच्या बॅचचे वर्ग मित्र मैत्रिणी व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून नियोजन करून एकत्र आले होते. दोन दिवसांच्या कालावधीत जुन्या आठवणींना उजाळा, गुरुजनांचा सन्मान, दिवंगत झालेल्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच एकत्रित भोजन, संगीताच्या तालावर सामूहिक नृत्य आणि एकमेकांची केलेली कौटुंबिक विचारपूस, यापासून भावी वाटचालीसाठी नवीन ऊर्जा मिळाल्याची तसेच शाळेबद्दलचे ऋणानुबंध अधिक दृढ झाल्याची भावना प्रत्येकाने व्यक्त केली. या आठवणी आणि भावनेने ओथंबलेल्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक एन बी राजकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी जेष्ठ शिक्षक एन डी माळी सर, पी एस पटेल, पोतदार सर ,श्रीमती राणे मॅडम,सौ. कलाल मॅडम, आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी दीपप्रज्वलन करून त्यानंतर दिवंगत गुरुजन, कर्मचारी, मित्र-मैत्रिणी आणि परिवारातील मंडळींना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. आपल्या प्रास्ताविकात सीमा कलाल यांनी स्नेह मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली तसेच कार्यक्रमाचे स्वरूप विशद केले. मित्र-मैत्रिणींनी उपस्थित शिक्षक वृंद व मान्यवरांना सन्मानचिन्ह, मानवस्त्र व गुलाब पुष्प देऊन देऊन सत्कार केला . या स्नेहमेळाव्यासाठी या सर्व मित्र-मैत्रिणींनी स्नेह मेळाव्याचा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतल.
आपल्या मनोगतातून प्रत्येकाने शाळेतील संस्कारांमुळे जीवनात झालेले परिवर्तन, कार्यक्षेत्र निवडण्यासाठी मिळालेले मार्गदर्शन याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित गुरुजनांनी देखील आपल्या या विद्यार्थ्यांना पुन्हा आशीर्वाद आणि सदिच्छा दिल्या. आरोग्याची काळजी घेण्याच्या सल्ला देखील दिला. विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील भरारी, प्रगती व यश पाहून अभिमान वाटत असल्याचे भावना शिक्षकांनी व्यक्त केली. झाली. या स्नेहमेळाव्याचे
दुपारच्या सत्रात सर्व मित्र-मैत्रिणीं म्हणजे शाळेचा माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शाळेला भेट दिली. शाळेचा आवारात फेरफटका मारला. अनुभूती पुन्हा घेतली. , एकमेकांच्या सापत्नीक परिचय करून घेणे असे कार्यक्रम दुपारच्या सत्रात पार पडले. त्यावेळी पुन्हा एकदा शाळेतील जुन्या आठवणी, विविध कला गुणदर्शनासह गीत गायन आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मित्र-मैत्रिणींनी पारंपरिक खेळ, नृत्यासह, गरबा तसेच लोकगीतांवर ठेका घेत आनंद लुटला, स्नेह मेळाव्याचा उत्कृष्ट आयोजन नियोजनाबद्दल स्थानिक मित्र-मैत्रिणींना धन्यवाद देत जगण्याची नवी उमेद आणि ऊर्जा घेत सर्वांनी भारवलेल्या अवस्थेत सोमवारी सायंकाळी आपापल्या गावाकडे प्रस्थान केले