Type Here to Get Search Results !

झणझणे सासवड गावातील डिपी उद्घाटन होऊनही न बसल्याने समस्याग्रस्त शेतकरी संतप्त : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख



झणझणे सासवड गावातील डिपी उद्घाटन होऊनही न बसल्याने समस्याग्रस्त शेतकरी संतप्त : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख


झणझणे सासवड येथील खताळ डिपीवर कनेक्शन धारक शेतक-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने डिपी नादुरुस्त होणे, कनेक्शन जास्त असल्याकारणाने ट्रान्सफाॅर्मरमधुन शेतीपंप चालु होण्यासाठी मुबलक वीज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने शेतीपंप बंद राहणे, शेतक-यांचे शेतीपंप वारंवार जळणे, शेतपीकांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात येत आहेत. त्यातच "दुष्काळात तेरावा महिना" या म्हणीप्रमाणे झणझणे सासवड येथील शेतक-यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे. 2 जानेवारी 2023 रोजी खताळ डिपी अंतर्गत अतिरिक्त डिपी बसवण्यात दिरंगाई झाल्यामुळे व खताळ डिपीवर प्रचंड वीजभार असल्यामुळे खताळ डिपी पुन्हा एकदा नादुरुस्त झाला असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिली आहे.


दरम्यान महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर शेतक-यांकडे असलेल्या वीजबीलांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वसुली केली होती. त्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये शेतक-यांनी भरलेल्या वीजबीलापैकी 33% रक्कम त्या गावातच शेतक-यांच्या हितासाठी खर्च करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाने स्थानिक वीज महावितरणच्या अधिकारी वर्गाला दिलेला होता. सासवड गावातील शेतक-यांनी भरलेल्या एकुण वीजबीलापैकी 33% रक्कमेतुन खताळ डिपी अंतर्गत अतिरिक्त डिपी बसवण्यासाठी प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. त्यानुसार मार्च 2022 मध्ये वाघेश्वरी मंदीराजवळ हा अतिरिक्त डिपी बसवण्यासाठी सांगाडा उभारणी (Structure) उभे करण्यात आले. परंतु आजपर्यंत डिपी उभारणीचा नुसता सांगाडाच उभा असुन डिपी लापता आहे, डिपी बसवलेला नाही, उद्घाटन मात्र नऊ महिन्यापूर्वीच झालेले आहे. अशी माहिती प्रदिप झणझणे यांचेसह उपस्थित शेतक-यांनी दिली.


शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे शेतक-यांच्या तक्रारी आल्यानंतर शेतक-यांसह फलटण वीज महावितरण कार्यालयास धडक मारली असता, सदर अतिरिक्त डिपीसाठी बनवलेल्या सांगाड्याचे उद्घाटन होऊनही तिथे डिपी का बसवला गेला नाही, नऊ महिने झाले तरी शेतकरी वीज महावितरणच्या मिळणा-या सोयी सुविधांपासुन वंचित का आहे, उभ्या असलेल्या बिनकामाच्या नुसत्या सांगांड्याचं शेतक-यांनी काय करायचं. असे प्रश्न उपस्थित केल्यावर वीज महावितरणचे मुख्य अभियंता मकरंद आवळेकर यांनी सर्व माहिती घेऊन, आठ दिवसात सदर डिपी बसवण्याचे संबंधित विभागास सक्त आदेश दिलेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad