मोहोळ तालुका स्तर क्रीडा स्पर्धेत जि. प.प्रा.आदर्श पापरी शाळेचा दरारा कायम
दि 30/12/2022 रोजी मोहोळ स्टेशन येथे संपन्न झालेल्या तालुका स्तर क्रिडा स्पर्धेत पापरी शाळेने दरवर्षीप्रमाणे आपला दरारा कायम राखत पुढील जिल्हा स्तर क्रिडा प्रकारात प्रवेश केला.
स्पर्धांचे निकाल
मोठा गट(सांघिक)
कब्बड्डी मुले विजेता
लंगडी मुले विजेता
लंगडी मुली विजेता
लहान गट
कबड्डी मुली विजेता
लंगडी मुले विजेता
लंगडी मुली विजेता
वैयक्तिक स्पर्धा
मोठा गट
धावणे (100मी)
मुले
जियान मुजावर- प्रथम
मुली
ज्ञानेश्वरी कारंडे- प्रथम
मोठा गट(200मी)
मुले
जियान मुजावर - प्रथम
अशाप्रकारे तालुकास्तर स्पर्धेत जि प पापरी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ठ खेळ सादर केला.
या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तसेच या विद्यार्थ्याचे श्री.स्वामी साहेब(ग.शि.अधिकारी) श्री.विकास यादव साहेब (विस्तार अधिकारी ) श्री.श्रीकांत खताळ(मुख्याध्यापक) व शा. व्य. स अध्यक्ष व सदस्य यांनी विशेष अभिनंदन केले व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले