Type Here to Get Search Results !

काळू धरणाला विरोध दर्शविण्यासाठी मुरबाड तहसीलदार कार्यालयावर निदर्शने



काळू धरणाला विरोध दर्शविण्यासाठी मुरबाड तहसीलदार कार्यालयावर निदर्शने


  

मुरबाड दिनांक 20/ प्रतिनिधी लक्ष्मण पवार  



 काळू नदीवरील धरणाला विरोध दर्शविण्यासाठी गुरुवारी मुरबाड तहसीलदार कार्यालय येथे काळू धरण प्रकल्प संघर्ष समिती व श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली




  धरणाला विरोध का ?


  एमएमआरडीएने 10  लाखाचे पॅकेज जाहीर केले त्याला स्थानिकांचा विरोध होता शासकीय आकडेवारी नुसार विस्थापित कुटुंबांची संख्या 787 कुटुंबे असली तरी अनेक कुटुंबे विभक्त झाल्याने प्रत्यक्षात कुटुंबियांची संख्या अधिक असल्याचा स्थानिकांचा दावा. हि रक्कम घेऊन आम्ही कुठे पुनर्वसित व्हायचे हा यक्ष प्रश्न असल्याने स्थानिकांचा विरोध


       काळू धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या गावानं बरोबरच 17--18 पाड्यांना जाणारे रस्ते पाण्याखाली येणार असल्याने त्यांचा संपर्क तुटणार आहे त्यांच्या पुनर्वसनाचीही सोय करणे गरजेचे आहे.    


(Box इंडवी तुळपुले) 


 काळू धरणाच्या मुख्य विरोधक श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेत्या इंदवी तुळपुळे यांचे म्हणने मुंबई ठाण्याला पाणी पुरवणारी जुनी धरणे 1/3 भाग गाळाने भरली आहेत हा गाळ काढल्यास पाण्याची उपलब्धता वाढेल पिण्याचे पाणी औद्योगिक वापर, बाग बगीचे, वाहने धुणे अश्या कामासाठी वापरले जाते ते टाळल्यास व पाणी गळती, पाणी चोरी  रोखल्यास पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढेल त्यामुळे नवीन मोठ्या धरणाची आवश्यकता भासणार नाही. 


(Box माजी आमदार गोटीराम पवार) 


 काळू नदीला मोठे धरण बांधण्या ऐवजी 5--6 छोटी छोटी धरणे बांधल्यास मोठ्या धरणा एवढेच पाणी उपलब्ध होईल व मोठ्या संख्येने होणारे विस्थापन टळेल. 

       


     शहरी भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी काळू नदीवर धरण बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे  काळू धरण बांधल्यास पाच गावे पूर्णतः व आठ गावे अंशतः बुडणार आहेत तर कित्येक गावांचे रस्ते पाण्या खाली जाणार आहेत धरण  बांधण्यास परवानगी देताना ग्राम सभांचे संवैधानिक अधिकार डावलण्यात आले आहेत , स्थानिक लोकांना विश्वासात घेतले नाही मोठे धरण बांधणे ऐवजी लहान बंधारे बांधले तर कोणत्याही गावाला विस्थापित करावे लागणार नाही असे सांगत ग्रामस्थांनी धरणाला विरोध दर्शविला यावेळी आर पी आय ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने , श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे आदींची भाषणे झाली व नंतर धरण बांधण्यास विरोध असल्या बाबत निवेदन देण्यात आले 


      यावेळी  संतोष निमसे , अशोक पठारे यांचे सह तळेगाव , चासोळे , आंबिवली , झाडघर , वाकळवाडी परिसरातील लोक उपस्थित होते


     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News