Type Here to Get Search Results !

आदिवासी आश्रम शाळा शिक्षकांची शैक्षणिक परिषद उत्साहात संपन्न



आदिवासी आश्रम शाळा शिक्षकांची शैक्षणिक परिषद उत्साहात संपन्न



किनवट प्रतिनिधी : गजानन वानोळे 



आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक व एलएफइ संस्था पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने इआरसी शैक्षणिक गुणवत्तेच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी प्रकल्य कार्यालय किनवट अंतर्गत असलेल्या शासकीय व अमुदानित एकूण ३८ आश्रम शाळेतील २२५ प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक परिषद दिनांक ९ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान संपन्न झाली 




 प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांच्या ३ शैक्षणिक परिषदेचे आयोजन केंद्रनिहाय किनवट सहस्त्रकुंड व भोकर या ठिकाणी करण्यात आले होते शैक्षणिक क्षेत्रातील बदलत्या प्रवाहनुसार आश्रमशाळेतील शिक्षकांच्या अध्यापनाच्या तंत्रात बदल होणे गरजेचे आहे या शैक्षणिक पध्दतीचे आयोजन करण्यात आले शैक्षणिक गुणवंता वाढ शिक्षकांच्या कौश्यल्य विकास वाढ हा मुख्य उद्देश समोर ठेवून आदिवासी विभागाने ह्या नविन कालबाहय उपक्रमाची निर्मिती केली आहे या शैक्षणिक परिषदेसाठी सुलभक म्हणून विषय तज्ञ धमरत्न घुले व संदिप राठोड यांनी मार्गदर्शन केले या परिषदेस यशस्वी करण्यासाठी मनोज टिळे ( स.प्र.अ. शिक्षण ) नागोराव चटलेवाड (स.प्र.अ. शिक्षण) संदीप कदम ( अ.वि. निरीक्षक) स्मिता पहूरकर ( अ. वि. नि.) दत्तात्रय डोंगशेनवार,

किरण बोर्डेजोशी, छाया तुपेकर, मालती गोरे, धनजय उरकुडे, यांनी सनियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.केंद्रस्तर आयोजनासाठी माधव देशमुखे, संजय पुरी, रामेश्वर जकीलवाड, उल्हास पवार, सुरेश जाधव, सुनिल फेंडर यांनी दर्जेदार भौतिक सुविधा व भोजन व्यवस्था उत्तमरित्या करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad