ह. मंगेवाडी मुलीच्या जन्माचे अंगणवाडी सेविकेकडून अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले
ह. मंगेवाडी प्रतिनिधी: आबासाहेब शेवाळे
सांगोला, हटकर मंगेवाडी गावामध्ये मुलगी जन्माला आल्याने या गावात दोन दाम्पत्यांच्या मुलींचे अंगणवाडी सेविकेतील हार व पुष्पगुच्छ देऊन अंगणवाडी शाळेत स्वागत करण्यात आले. यामध्ये महादेव मारुती व समाधान बिराजदार यांना कन्या प्राप्ती झाल्याने या दोन दाम्पत्यांच्या मुलींचे अंगणवाडी शाळेत अंगणवाडी सेविकेकडून हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे. एरवी मुलगा झाला म्हणून गावभर टेंबा मिळवणाऱ्या लोकांना या दोन दाम्पत्यांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे. मुलगी शिकली प्रगती झाली असं हे वाक्य फक्त कागदावर तीच नाही तर हटकर मंगेवाडी येथील या दोन दाम्पत्यांनी व अंगणवाडी सेविकेने ते प्रत्येक क्षणात मुलीच्या जन्माचे स्वागत करून सिद्ध केलेलं आहे.( बायको पाहिजे, बहिण पाहिजे, आई पाहिजे, मैत्रीण पाहिजे, मग मुलगीच का नको) मुलाची अपेक्षा ठेवणाऱ्या दांपत्याने हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलीच्या जन्माचे स्वागत करावे. असे या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. हटकर मंगेवाडीत या मुलींच्या जन्माचे स्वागत करताना. उपस्थित अंगणवाडी सेविका अशा मॅडम, कलावती भुसनर मॅडम, या दोन चिमुकल्या मुलींचे पालक शाळेतील विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.