Type Here to Get Search Results !

हिमायतनगर शहरातील मोकाट जनावरांचा रेबीज आजाराने तडफडून मृत्यू



हिमायतनगर शहरातील मोकाट जनावरांचा रेबीज आजाराने तडफडून मृत्यू..


शिवसैनिकांनी केला न.पं. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त...




हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे/- शहरात ठीक ठिकाणी मोकाट जनावरांचा वापर नेहमीच पाहायला मिळतो त्यामुळे येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे सह आदी जणांनी या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे वारंवार करून सुद्धा या बाबीची त्यांनी कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्याने आज एका मुक्या जनावरास (बैलास)शहरातील पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ते मुके जनावर शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात सैरावैरा फिरून असंख्य शाळकरी व ज्येष्ठ नागरिकांना व मंदिरास येणाऱ्या महिलांना जखमी करत होते हे पाहताच येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे,देविदास शिंदे यांनी त्या जनावरास काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्या बैलास फास टाकून त्याला पकडले व पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के यांना तात्काळ संबंधित मुक्या जनावरावर उपचार करण्यासाठी बोलावून त्यावर उपचार करण्यास सांगितले तेव्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी असे सांगितले की संबंधित जनावरास रेबीज हा आजार झाला आहे त्यामुळे ते जनावर काही वेळा नंतर दगावण्याची शक्यता आहे त्यामुळे उपस्थित नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी याची योग्य ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावा असे सांगितले अन्यथा या जनावरापासून इतर जनावरास सुद्धा हा आजार पसरण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे...


त्यामुळे संबंधित घटनेला नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे उपस्थित असलेल्या नागरिकांनी बोलून दाखवले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad