परिक्षापूर्वी परिक्षेवर चर्चा कार्यक्रम चित्रकला स्पर्धा आयोजन
स्पर्धेचा युगात पराभवाला न घाबरता स्पर्धेत सहभागी होणे महत्वाचे असून विद्यार्थांनी पारितोषिक मिळाले नाही तरी नाराज न होता. सहभागी होणे महत्वाचे आहे तसेच परीक्षा बाबत तणाव न घेता त्याला समोरे जा असे सांगत विद्यार्थांना प्रेरित केले तसेच चित्रकला विषय बाबत त्यांचा विद्यार्थी दशेचे अनुभव स्पर्धकांना सांगितले.
तर आमदार राजेश पाडवी यांनी बालपणी शिक्षण साठी आश्रम शाळेत कसे शिकलो तसेच शिक्षण कसे उपयुक्त असते या बाबत विद्यार्थी शी संवाद साधत असताना सांगितले की मी पण एक सर्व सामान्य कुटुंबाचा विद्यार्थि होतो पण अभ्यास कडे लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळते असे सांगत मार्गदर्शन केले
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षेवर चर्चा या कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित तसेच शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी व मान्यवरांचे उपस्थितीत घेण्यात आला.
या वेळी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद चा अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थित होते .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ पासून परीक्षेपूर्वी परीक्षा वर चर्चा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची थेट संवाद साधत त्यांच्यावरील परीक्षेचा कालावधीत येणारा ताण तणाव कमी करण्यासाठी आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे या उपक्रमाचा उद्देश होता. हा एक अतिशय उपयुक्त असा उपक्रम विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळातील ताणतणाव मुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. या कार्यक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी भाजपा प्रदेश सदस्य डॉ शशिकांत वाणी, माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, पं. स.सदस्य दाज्या पावरा, कैलास चौधरी, माजी नगरसेवक रामानंद ठाकरे, दीपक पाडवी प्रतापपुर शाळेचे मुख्यद्यापक हेमलाल मगरे, नारायण ठाकरे, शिरीष माळी, प्रकाश वळवी आदी उपस्थित होते
सदर कार्यक्रम तळोदा येथील शिक्षण महर्षी प्रा.भाई साहेब. गो. हू.महाजन हायस्कुल व शी. ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी अजित प्राचार्य टवाळे यांच्या मार्गदर्शन खाली
पर्यवेक्षक ए. एल.महाजन कार्यालयीन अधीक्षक डी.पी.महाले. आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्र संचलन सुरेश जोहरी व आभार प्रदर्शन सुनिल सूर्यवांशी यांनी केले स्पर्धेचे निवड समिती म्हणून कलाशिक्षक संकेत माळी
सुरेश जोहरी अमोल टवाळे
. व्ही टी वसावे. आकाश टवाळे
इंद्रसिंग राजपूत यांनी काम पाहिले