व्यसनमुक्ती समाज प्रबोधन भारुडातून जनजागृती
तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी शिबिर जिल्हा परिषद शाळा बुधावल येथे घेण्यात आले त्यावेळी प्रसिद्ध भारुडकार व जिल्हा परिषद शाळा आष्टे येथील पदोन्नती मुख्याध्यापक कैलास लोहार यांचे भारुडातून व्यसनमुक्ती या विषयावरती एक दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली होती.
त्यावेळी श्री कैलास लोहार यांनी विविध वेशभूषा करून त्यात वासुदेव, जोशी ,वेडी ,स्त्रीपात्र इत्यादी मधून विद्यार्थ्यांना बेटी बचाव बेटी पढाव, दारू बंदी,घुटका बंदी,मटका बंदी, तंबाखूमुक्ती, कुटुंब कल्याण ,निर्मळ ग्राम योजना ,आई-वडील सांभाळ, अंधश्रद्धा निर्मूलन व वृक्षारोपण इत्यादी विषयावर अतिशय प्रभावी हसत खेळत विनोदी शैलीतून अहिराणी आणि मराठी भाषेतून जनजागृती केली त्यांनी विद्यार्थ्यांना आपले आदर्श जीवन जगण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे त्यात शिक्षण ,मोबाईलचा योग्य वापर ,आपले आई वडिलांचे संस्कार यासाठी विशेष भर देऊन लक्ष देवून आपण आपले जीवन जगावे व या शिबिरातून चांगल्या संस्कारातून विद्यार्थी घडत असतात यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले .
यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. पंकज सोनवणे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा पराग तट्टे ,डॉ प्रा.सुनीता गायकवाड महिला कार्यक्रम अधिकारी व बहु संख्य विद्यार्थी उपस्थित होते.