मुरबाड मध्ये विविध उपक्रमांनी क्रांतिविर हुतात्मा हिराजी पाटील यांची जयंती साजरी !
मुरबाड दिनांक 21 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील, सिद्धगड आझाद दस्त्यातील इंग्रजांच्या बेछूट गोळीबारात पहिला हुतात्मा ठरलेले क्रांतीविर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची जयंती मुरबाड मध्ये विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.यानिमित्त अखिल आगरी समाज मुरबाड तालुक्याच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.ज्यामध्ये सकाळी प्रतिपंढरपुर धानिवलीचे मठाधिपती कमलनाथ नवनाथ महाराजांच्या हस्ते व मोठ्या संख्येने उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते विधीवत दुग्ध अभिषेक, पुष्पहार अर्पण व क्रांतीज्योत प्रज्वलित करून यथाविधी मानवंदना देण्यात आली.यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, व मुरबाड नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे हे मान्यवर उपस्थित होते
.यावेळी हिराजी पाटील अमर रहे,भाई कोतवाल अमर रहेच्या घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले. त्यांनतर महाआरोग्य शिबिरात,विविध प्रकारच्या शारीरिक चाचण्या,डोळे तपासणी, व औषधौपचार करण्यात आल्या.मोठ्या प्रमाणात नागरीकांनी सहभाग घेऊन सदर शिबीराचा लाभ घेतला. या कामी ,ओमसाई हाँस्पिटल सरळगाव चे डॉक्टर-रामचंद्र भोईर व त्यांच्या संपूर्ण स्टाफ,श्रीमंगल मुर्ती क्लिनिक चे डॉ. कमलाकर देशमुख, गुरु ओम क्लिनिक मुरबाडचे डॉ. प्रशांत धुमाळ, अंकुर हाँस्पिटल च्या डॉ. प्रज्ञा धुमाळ, श्रीप्रायमरी आय केअर मुरबाड चे डॉ. पंकज शिंगोळे व संपूर्ण स्टाफ,सुमंगल क्लिनिकल चे डॉ. अजिंक्य डोंगरे व संपूर्ण स्टाफ यांनी संपूर्ण दिवस मोफत सेवादान केले. महिलांसाठी हळदी कुंकू, रात्रौ तालुक्यातील भजनी मंडळाचे संगीत भजन,पोवाडे,स्फुर्तीगितांचा मजनसंध्या हा शानदार कार्यक्रम पार पडला.त्यामध्ये गायक भुषण देशमुख, तानाजी माळी, कन्हैया माळी,योहन देशमुख, दर्शन वाघचौडे,अजिंक्य हुमणे या सर्व कलाकारांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला.