विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट कार्यक्रमातून ऐतिहासिक बारगळ गढीला भेट
गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या अत्यंत ऐतिहासिक असणाऱ्या बारगळ गढी ला तळोद्यातील शिक्षण महर्षी प्राचार्य गो,हु,महाजन शाळेतील इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली यावेळी बारगाव कुटुंबाचे वंशज अमरजीत बारगळ यांनी या प्राचीन ऐतिहासिक स्थळाचा इतिहास विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभा केला ३६४ वर्षांपूर्वी या प्राचीन वास्तूची उभारणी कशा पद्धतीने झाली या प्राचीन वास्तूचे ऐतिहासिक दाखले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिले मल्हाराव होळकर यांनी कशा पद्धतीने लहानपण या भागात घालवले तसेच बारगळ कुटुंबाच्या सुरुवातीपासून ते आजतागायत माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली यावेळी शाळेचे उपप्राचार्य प्रा.अमरदिप महाजन इंग्लिश मिडीयम चा प्राचार्य शीतल महाजन गो,हु,महाजन शाळेतील इतिहास विशय शिक्षक सुनील सूर्यवंशी एस एस सोनवणे स्वप्नील महाजन तसेच पी.आर.वळवी. ए.जी.पवार. मनीषा सोनवणे ए.पी.वळवी. आदींनी या ऐतिहासिक स्थळ भेटीदरम्यान सहकार्य केले.
या वेळी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना उप प्राचार्य अमरदिप महाजन यांनी सदर जागा एतीहासिक दृष्ट्या तळोदा शहर साठीच नव्हे तर खानदेश साठी अमूल्य ठेवा असून आपण तिची जपवणूक केली पाहिजे तसेच त्याचे संवर्धन केले पाहिजे.